शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

कोरोनाची नवीन लक्षणे ? ही लक्षणे का आढळतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 06:32 IST

नव्या कोरोनाबाधितांमध्ये ही लक्षणे आढळून येण्याची दाट शक्यता असून त्यांना स्टेरॉइड्सचे उपचार देणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञ म्हणतात. 

लोकमत न्यूज नेटवर्क :

कोरोनाच्या नवनव्या व्हेरिएंट्सची उत्पत्ती जगभरात होत आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या लक्षणांमध्येही बदल होत आहेत. आता कोरोनाची नवीन लक्षणे समोर आली आहेत. म्हणजे घसा खवखवणे, वास-चव या जाणिवा नाहिशा होणे ही लक्षणे आता मागे पडली आहेत. 

ही लक्षणे का आढळतातज्यांना कोरोनाची लागण झाली आहे त्यांच्या कानातील पेशींना सूज येते. त्यामुळे ऐकण्याची क्षमता कमी होते.कोरोनाबाधितांच्या ऐकण्याच्या क्षमतेत घट झाल्याचे सध्यातरी निदर्शनास आलेले नाही. मात्र, ही संख्या वाढू शकते, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. नव्या कोरोनाबाधितांमध्ये ही लक्षणे आढळून येण्याची दाट शक्यता असून त्यांना स्टेरॉइड्सचे उपचार देणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञ म्हणतात. 

n    देशात मंगळवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत कोरोनाचे नवे ३१,२२२ रुग्ण आढळले तर २९० जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृत्यू ४,४१,०४२ झाले आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निवेदनात म्हटले. n    एकूण बाधितांच्या संख्येत मृत्यूचे प्रमाण १.३३ टक्के तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.४८ टक्के आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या ३,९२,८६४ आहे. n    देशात २० लाख रुग्ण ७ ऑगस्ट, २०२० रोजी, ३० लाख २३ ऑगस्ट रोजी, ५ सप्टेंबर रोजी ४० लाख , १६ सप्टेंबर रोजी ५० लाख होते.

दुसऱ्या लाटेतली लक्षणे काय होती ?

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत डेल्टा व्हेरिएंटने कहर केला होता.

यादरम्यान अतिसार, मळमळणे आणि उलट्या होणे ही लक्षणे प्रामुख्याने निदर्शनास आली होती.

ताप येणे. त्यात चढ-उतार होणे ही कोरोनाची सर्वसामान्य लक्षणे होती. 

कोरोनाची बाधा असल्याचे आढळले तर शरीराचे तापमान, श्वासोच्छवासाचा दर, रक्तदाब, प्राणवायूची पातळी आणि रक्तातील साखर या सगळ्यांचे गणन केले जाणे गरजेचे आहे. त्यामुळे म्युकरमायकोसिस व इतर प्रकारच्या वैद्यकीय गुंतागुंत टळतात, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.  

खबरदारी काय?नवीन लक्षणांपैकी काहीही आढळले तरी तातडीने कोरोना चाचणी करून घेणे इष्ट, असे तज्ज्ञांचे मत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस