शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून 200 रूपयांची नोट येणार चलनात, पण एटीएममध्ये मिळणार नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2017 10:06 IST

आजपासून 200 रुपयांची नोट चलनात येणार आहे. छोट्या रकमेच्या नोटांची उपलब्धता वाढावी यासाठी तेजस्वी पिवळ्या रंगातील ही नोट चलनात आणण्यात येत आहे. पण...

ठळक मुद्देआजपासून 200 रुपयांची नोट चलनात येणार आहे. नव्या नोटांसाठी एटीएम रिकॅलिबरेशन करण्याची आवश्यकता असल्याने सध्यातरी या नोटा एटीएममध्ये मिळण्याची शक्यता कमी

नवी दिल्ली, दि. 25 - आजपासून 200 रुपयांची नोट चलनात येणार आहे. छोट्या रकमेच्या नोटांची उपलब्धता वाढावी यासाठी तेजस्वी पिवळ्या रंगातील ही नोट चलनात आणण्यात येत आहे. पण इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार नव्या नोटांसाठी एटीएम रिकॅलिबरेशन करण्याची आवश्यकता असल्याने सध्यातरी या नोटा एटीएममध्ये मिळण्याची शक्यता कमी आहे.  

रिझर्व्ह बँकेला नव्या नोटा चलनात आणण्याची परवानगी देण्यात आल्याची घोषणा केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केल्यानंतर एक दिवसातच ही नोट आणली जात आहे. महात्मा गांधी मालेतील या नोटेवर गव्हर्नर ऊर्जित पटेल यांची स्वाक्षरी आहे, असे रिझर्व्ह बँकेच्या निवेदनात म्हटले आहे.अशी असेल 200 रुपयांची नवी नोट-समोरील बाजू : नोट प्रकाशात धरल्यास पारदर्शक होऊन २०० हा आकडा दिसेल. देवनागरी लिपीत २०० आकड्याची प्रतिमा नोटेवर असेल. नोटेवर मध्यभागी महात्मा गांधी यांची प्रतिमा असेल. आरबीआय, भारत, इंडिया आणि २०० ही अक्षरे सूक्ष्म आकारात छापलेली असतील. सुरक्षा धाग्यात भारत आणि आरबीआय लिहिलेले असेल. नोट हलविल्यास धागा हिरवा आणि निळा या रंगांत परिवर्तित होईल. महात्मा गांधी यांच्या प्रतिमेच्या उजव्या बाजूस हमी आणि वचनासह गव्हर्नरांची स्वाक्षरी असेल. नोटेच्या खालच्या बाजूस उजवीकडे रंग बदलणारे रुपयाचे चिन्ह आणि २०० हा आकडा असेल. उजव्या बाजूस अशोक स्तंभाचे चिन्ह असेल. महात्मा गांधी यांचे चित्र आणि इलेक्ट्रोटाइप (२००) जलचिन्ह (वॉटरमार्क) असेल. नोटेच्या वर डाव्या बाजूला तसेच खाली उजव्या बाजूला मोठा होत जाणारा नोटेचा क्रमांक असेल. अंधांना नोट ओळखता यावी यासाठी महात्मा गांधी यांची प्रतिमा, अशोक स्तंभ, एच हे इंग्रजी अक्षर, चार कोनीय रेषा आणि दोन वर्तुळे उंचवट्यात छापलेली असतील. नोटेला स्पर्श केल्यास ही चिन्हे हाताला जाणवतील.

मागील बाजू : डाव्या बाजूला वर्ष असेल. स्वच्छ भारत मोहिमेचे बोधचिन्ह आणि घोषवाक्य, सांचीच्या स्तुपाची प्रतिमा, विविध भाषांची सूची, देवनागरी लिपीत 200 हा आकडा असेल. यापूर्वी समाजमाध्यमांवर वेगवेगवळ्या रंगाच्या दोनशेच्या नोटांचे फोटो व्हायरल झाले होते. काहींचा रंग हिरवा तर काहींचा निळा होता. मात्र, रिझर्व्ह बँकेने वेगळ्याच रंगाची नोट येणार असल्याचे वेबसाइटवर जाहीर केले.