शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

“उद्घाटन राष्ट्रपतींनीच करावे”; नवीन संसद भवनाचा वाद सुप्रीम कोर्टात, जनहित याचिका दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2023 13:50 IST

नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावरून आरोप-प्रत्यारोप होत असून, हा वाद आता सुप्रीम कोर्टात पोहोचला आहे.

New Parliament Inauguration row in Supreme Court: २८ मे रोजी नवीन संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे. मात्र, या सोहळ्यापूर्वीच नवा वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. नवीन संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी करावे, अशी आग्रही मागणी विरोधकांनी केली आहे. तसेच या कार्यक्रमाला राष्ट्रपतींना निमंत्रण न दिल्यावरून तीव्र नाराजी व्यक्त करत २० पक्षांनी या सोहळ्यावर बहिष्कार घातला आहे. मात्र, यातच आता नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. याप्रकरणी एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. 

नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावरून केंद्रातील मोदी सरकारवर विरोधक टीका करत असून, सत्ताधारी भाजप विरोधकांच्या टीकेचा समाचार घेत आहेत. यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. नवीन संसद भवनाच्या उद्घाटनप्रकरणी आता सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली असून,केंद्र सरकारला निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे.

जनहित याचिकेत नेमके काय म्हटलेय?

सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत, राष्ट्रपतींच्या हस्ते नवीन संसदेचे उद्घाटन करण्यासाठी लोकसभा सचिवालय आणि भारत सरकारला निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच उद्घाटन समारंभात राष्ट्रपतींचा समावेश न करून सरकारने संविधानाचे उल्लंघन केले आहे. यातून संविधानाचा आदर केला जात नाही, हे दिसून येते. संसद ही देशाचे सर्वोच्च संस्था आहे. संसदेत राज्यसभा आणि लोकसभा यांचा समावेश होतो. राष्ट्रपतींना दोन्ही सभागृहांचे अधिवेशन बोलावणे किंवा अधिवेशन रद्द करण्याचा अधिकार आहे. यासोबतच संसद किंवा लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकारही राष्ट्रपतींना असतो. राष्ट्रपती हा संसदेचा अविभाज्य भाग आहे. राष्ट्रपतींना या समारंभापासून दूर ठेवण्यात आले. राष्ट्रपती उद्घाटन समारंभाचा भाग नाहीत, हा सरकारने घेतलेला निर्णय योग्य नाही, असे याचिकेत म्हटले आहे. 

दरम्यान, वकील सीआर जया सुकीन यांनी सदर जनहित याचिका दाखल केली आहे. नवीन संसद भवन उद्घाटनाच्या सोहळ्याला भाजपसह १७ पक्ष सहभागी होणार आहेत. तर २० विरोधी पक्षांनी या उद्घाटन समारंभात सहभागी होणार नसल्याचे म्हटले आहे.

 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCentral Governmentकेंद्र सरकार