शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

New Parliament : 'जेव्हा लोक विचारतील आम्ही काय बांधले…; संसद भवनाच्या उद्घाटनप्रसंगी मजूर म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2023 09:25 IST

नवीन संसद भवनाच्या उद्घाटनापूर्वी पूजा आणि मंत्रोच्चारानंतर लोकसभा अध्यक्षांच्या आसनाजवळ सेंगोल स्थापित करण्यात आला.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील नवीन संसद भवनाचे उद्घाटन करण्यात आले. नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभाची सुरुवात पूजेने झाली. या पूजेला पंतप्रधानांसह लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लाही उपस्थित होते. नवीन संसद भवनाच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदींनी इमारतीच्या बांधकामासाठी काम करणाऱ्या कामगारांचा सत्कार केला.

New Parliament Building Inauguration LIVE: हवन-पूजन.. सर्वधर्मीय प्रार्थना; पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवीन संसद भवनाचे उद्घाटन

मोदी सरकारच्या सर्वात मोठ्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या नवीन आधुनिक संसदेची इमारत प्रत्यक्षात आणण्यासाठी हजारो मजूर दोन वर्षांहून अधिक काळ अथक परिश्रम करत आहेत. ६०,००० कामगार आणि पर्यवेक्षक इमारत ऑन-साइट आणि ऑफ-साइट तयार करण्यासाठी काम करत आहेत.

उद्घाटनाच्या एक दिवस आधी शनिवारी संपूर्ण संकुल बंद ठेवण्यात आले होते. बूम बॅरिअरमधून फक्त विशेष स्क्रीनिंग केलेल्या कार, व्हीआयपी, सुरक्षा कर्मचारी, पोलिस आणि इतर कर्मचाऱ्यांना आत प्रवेश देण्यात आला. लोखंडी गेट ८ वर बॅरिकेड्स लावण्यात आले ज्यातून मजूर ये-जा करत होते.

या कामासाठी मध्यप्रदेशमधीलही काही मजूर होते. यातील मजूर सांगतात,  गेल्या काही वर्षांपासून दिवसाचे १२ तास काम करतो आणि महिन्याला सुमारे १७,००० रुपये कमावतो. “काम जवळपास ९९ टक्के पूर्ण झाले आहे. आम्ही दोन शिफ्टमध्ये २४×७ काम केले आहे. कोरोमा महामारीच्या काळातही आम्ही थांबलो नाही.” फेब्रुवारी २०२१ मध्ये आलेल्या एका फोन कॉलपासून याची सुरुवात झाल्याचे  त्यांनी आठवण सांगितली. 

बिहारमधील २४ वर्षीय कामगार इम्रान सांगतात की,  इमारतीच्या काही भागात मचान तयार करण्याचे काम अजूनही सुरू आहे आणि ते पूर्ण होण्यासाठी आणखी काही महिने लागतील.  “हे काम खूप अवघड होते, पण जर लोकांनी आम्हाला विचारले की आम्ही काय केले, तर आम्ही म्हणू शकतो की आम्ही संसद भवन बांधले, तेही दोन वर्षांत. आपण आपल्या डोळ्यांसमोर संपूर्ण इमारत बांधलेली पाहिली आहे.

टॅग्स :Parliamentसंसद