शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

'कट्टर विचारसरणीने प्रेरित होऊन नव्हे तर थ्रिल अनुभवण्यासाठी तरूण वळताहेत दहशतवादाकडे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2018 09:48 IST

हा अहवाल काश्मीरमधील पारंपरिक दहशतवादाबद्दलची धारणा बदलायला लावणार आहे.

जम्मू: गेल्या काही काळामध्ये काश्मीर खोऱ्यात दहशतवादाचा एक नवा पॅटर्न उदयाला येत असल्याची बाब पोलीस अहवालातून पुढे आली आहे. या अहवालानुसार दहशतवादी संघटनांमध्ये नव्याने भरती होणारे तरूण हे कोणत्याही कट्टर विचारसरणीने प्रेरित असलेले नाहीत. तर ते काश्मीरमधील सर्वसामान्य कुटुंबातून आलेले असून यापैकी बहुतांश जण सरकारी शाळांमध्ये शिकलेले असल्याची बाब या अहवालात नमूद करण्यात आली आहे.जम्मू-काश्मीर पोलीस दलाच्या गुन्हे अन्वेषण विभागाने 2010 ते 2015 या काळात दहशतवादाचा मार्ग स्वीकारणाऱ्या 156 स्थानिक तरूणांच्या कौटुंबिक आणि सामाजिक पार्श्वभूमीचा अभ्यास करून हा अहवाल तयार केला आहे. हा अहवाल काश्मीरमधील पारंपरिक दहशतवादाबद्दलची धारणा बदलायला लावणार आहे. त्यामुळे आता दहशतवादाच्या नव्या स्वरुपाशी कशाप्रकारे सामना करायचा, यासाठी सुरक्षा यंत्रणांनी नव्याने रणनीती आखावी लागणार आहे. या अहवालातील सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे दक्षिण काश्मीरचा अपवाद वगळता दहशतवादी संघटनांमध्ये नव्याने भरती होणारे तरूण हे विशिष्ट विचारसरणीने प्रेरित नाहीत. हा पॅटर्न सहज ओळखता येण्यासारखा आहे. जर अजूनही कट्टर विचारसरणीने प्रेरित होऊनच तरूण दहशतवादाकडे वळत असते तर संपूर्ण काश्मीर खोऱ्यात तसे झाले असते. मात्र, हे तरूण सुसंस्कृत आणि सधन कुटुंबातील असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे यापैकी अनेक तरुण हे मदरशांमध्ये शिकले नसून सरकारी शाळांमधून त्यांचे शिक्षण पूर्ण झाले आहे. याशिवाय, या तरूणांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना भारतीय सुरक्षा दलाकडून त्रास देण्यात आल्याची कोणतीही पार्श्वभूमी नाही. त्यामुळे बहुतांश तरुण हे केवळ तारुण्यसुलभ रोमांच अनुभवण्याच्या भावनेतून दहशतवादाकडे वळाले असावेत, असा निष्कर्ष या अहवालात नमूद करण्यात आला आहे. 

टॅग्स :TerrorismदहशतवादJammu Kashmirजम्मू-काश्मीर