शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

भारतातील नवे आयटी नियम आम्हाला लागू होत नाहीत; गुगलचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 06:41 IST

न्यायालयाने केंद्राचे मत मागविले

नवी दिल्ली : केंद्र सरकारने डिजिटल माध्यमांसाठी लागू केलेले नवे माहिती-तंत्रज्ञानविषयक  (आयटी) नियम आमच्या सर्च इंजिनला लागू होत नाही, असा दावा अमेरिकेतील गुगल या कंपनीने केला आहे. त्याबाबत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारचे मत मागविले आहे. इंटरनेटवरून आक्षेपार्ह गोष्टी काढण्याबाबत दिल्ली उच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशांनी गुगलला दिलेला आदेश बाजूला ठेवावा, अशीही विनंती या कंपनीने न्यायालयाच्या खंडपीठाला केली आहे. वाईट प्रवृत्तीच्या  काही लोकांनी एका महिलेची छायाचित्रे एका पोर्नोग्राफी वेबसाइटवर झळकविली होती. न्यायालयाने आदेश देऊनही गुगलने ही छायाचित्रे हटविली नाहीत. न्यायाधीशांनी दिलेल्या निर्णयाविरोधात गुगलने उच्च न्यायालयाच्या खंडपीठापुढे दाद मागितली आहे. त्यावर केंद्र व दिल्ली सरकार, इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर असोसिएशन ऑफ इंडिया, फेसबुक, आक्षेपार्ह छायाचित्रे झळकविण्यात आली ती पोर्नोग्राफी वेबसाइट व जिची छायाचित्रे आहेत ती महिला यांच्याकडून दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी. एन. पटेल यांनी मत मागविले आहे. मध्यस्थ नाहीइंटरनेटवरील माहितीसाठी सोशल मीडिया मध्यस्थाचे काम करते, असे नव्या माहिती-तंत्रज्ञान नियमांद्वारे सिद्ध होते, असे दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निरीक्षण रद्द करावे व कोणत्याही कायदेशीर कारवाईपासून संरक्षण द्यावे, अशी विनंती गुगल कंपनीने या न्यायालयाच्या खंडपीठापुढे केली आहे. एका न्यायाधीशांनी २० एप्रिल रोजी दिलेल्या निकालात गुगलच्या सर्च इंजिनबाबत चुकीची मते व्यक्त केली आहेत, असा युक्तिवाद गुगलने दिल्ली उच्च न्यायालयात केला आहे. 

टॅग्स :googleगुगल