शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

मर्यादेपेक्षा अधिक मद्य घरात ठेवायचं असल्यास परवाना बंधनकार; 'या' राज्यानं केला नियम

By जयदीप दाभोळकर | Updated: January 9, 2021 20:34 IST

राज्य सरकारनं नव्या उत्पादन शुल्क धोरणावर केलं शिक्कामोर्तब

ठळक मुद्देराज्य सरकारनं नव्या उत्पादन शुल्क धोरणावर केलं शिक्कामोर्तब ६ हजार कोटी रूपयांचा महसूल वाढवण्याचं उद्दिष्ट

मर्यादेपेक्षा अधिक मद्य आपल्या घरात ठेवायचं असेल तर आता संबंधित व्यक्तीला त्यासाठी उत्पादन शुल्क विभागाकडून परवाना घ्यावा लागणार आहे. उत्तर प्रदेश सरकार या नियमात बदल करण्याच्या तयारीत आहे. सरकारनं ठरवून दिलेल्या मर्यादेच्या बाहेर जर एखाद्या व्यक्तीला घरात मद्य ठेवायचं असेल तर त्याला आता संबंधित विभागाचा परवाना घेणं बंधनकारक असेल. राज्य सरकारनं आपल्या नव्या धोरणावर शिक्कामोर्तब केलं आहे.२०२१-२२ सालच्या उत्पादन शुल्काच्या धोरणामध्ये सरकारनं बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. जर कोणाला घरात सरकारनं ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक मद्य ठेवायचं असल्यास त्यांना आता उत्पादन शुल्क विभागाकडे अर्ज करावा लागणार आहे. २०२१-२२ या वर्षासाठी परदेशी मद्य, बिअर आणि मद्याच्या आगाऊ साठवणुकीस १५ फेब्रुवारीपासून परवानगी देण्यात येणार आहे.योगी सरकारनं उत्पादन शुल्क विभागाकडून पुढील आर्थिक वर्षात ६ हजार कोटी रुपयांचा महसूल वाढवून तो ३४ हजार ५०० कोटी रूपये करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. याअंतर्गत उत्तर प्रदेशातच मद्य उत्पादनाला चालना देण्याचा विचार सुरू आहे. नव्या धोरणाचा उद्देश ईज ऑफ डुईंग बिझनेस आणि चांगल्या गव्हर्नंन्सला प्रोत्साहन देणं हे आहे. योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळानं शुक्रवारी २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी नव्या उत्पादन शुल्क धोरणाला मंजुरी दिली होती.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथ