शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

मोर्चे, आंदोलनांनी जंतर-मंतर पुन्हा गजबजणार, सुप्रीम कोर्टानं बंदी उठवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2018 14:48 IST

राजधानी नवी दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर आंदोलक पुन्हा एकदा आपला आवाज उठवताना दिसणार आहेत.

नवी दिल्ली - राजधानी नवी दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर आंदोलक पुन्हा एकदा आपला आवाज उठवताना दिसणार आहेत. जंतर-मंतर मैदानात आंदोलन करण्यावर लादण्यात आलेली बंदी सुप्रीम कोर्टानं हटवली आहे. दिल्लीमध्ये आंदोलनांवर पूर्णतः बंदी लादली जाऊ शकत नाही असे सांगत सुप्रीम कोर्टानं जंतर-मंतर आणि बोट क्लबवरील आंदोलनासाठी असलेली बंदी हटवण्यात आल्याचा निर्णय दिला. शिवाय, यासंदर्भातील सुनावणीदरम्यान न्यायाधीश ए.के.सिकरी आणि न्यायाधीश अशोक भूषण यांनी दिल्ली पोलिसांना नवीन मार्गदर्शिका तयार करण्यास सांगितले आहे. 

शेतकरी संघटना आणि अन्य संघटनांकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सुनावणी करताना कोर्टानं हा निर्णय दिला आहे. मध्य दिल्लीमध्ये शांततेनं आंदोलन करण्याची परवानगी याचिकाकर्त्यांनी केली होती. लादण्यात आलेल्या बंदीमुळे शांततेत आंदोलन करण्याच्या अधिकाराचे उल्लंघन होत असल्याचे याचिकाकर्त्यांनी सांगितले.

याचिकाकर्त्यांनी असेही म्हटले आहे की, ऑक्टोबर 2017 पासून राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानंतर जंतर-मंतरवर आंदोलन करण्यास बंदी लादण्यात आली होती. दुसरीकडे संपूर्ण मध्य दिल्लीमध्ये नेहमीच जमावबंदी लागू असते. यानंतर राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानंतर 10 ऑक्टोबरपासून पोलिसांनी येथे आंदोलनास परवानगी दिली नाही. हे आमच्या घटनात्मक आणि लोकशाही अधिकारांचे उल्लंघन असल्याचंही याचिकाकर्त्यांनी म्हटले होते. 

याचिकाकर्त्यांनी याप्रकरणी राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशाला आव्हान दिले होते. जानेवारी महिन्यात सुप्रीम कोर्टानं या याचिकेवर एमसीडी, दिल्ली पोलीस आणि एनडीएमसीला नोटीस जारी करुन दोन आठवड्यांत उत्तर देण्यास सांगितले. यावर राष्ट्रीय हरित लवादानं दिल्ली सरकारला जंतर-मंतरवर आंदोलन, सभांच्या आयोजनावर बंदी घालण्याचा आदेश दिला होता. यावर, राष्ट्रीय हरित लवादानं, रामलीला मैदानात आंदोलन करावे, असे म्हटले होते.

टॅग्स :Jantar Mantarजंतर मंतरSupreme Courtसर्वोच्च न्यायालयNew Delhiनवी दिल्ली