नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील प्रीत विहार पोलिस स्टेशन परिसरातून एक विचित्र घटना समोर आली आहे. एक महिला तिच्या कुटुंबासह महिंद्राच्या शोरुममध्ये नवीन Thar ची डिलिव्हरी घेण्यासाठी गेली होती. कार खरेदी केल्यानंतर महिलेने शोरुममध्येच गाडीची पुजा सुरू केली. पण, यादरम्यान, अशी घटना घडली, ज्याची कुणी कल्पनाही केली नसेल.
गाडीच्या पुजेदरम्यान महिलेने कार चालू केली आणि कारच्या चाकाखाली ठेवलेले लिंबू फोडण्यासाठी रेसिंग पेडल दाबले. या दरम्यान, कार अचानक वेगाने पुढे सरकली आणि थेट शोरुमची काच फोडून पहिल्या मजल्यावरुन खाली रस्त्यावर कोसळली. हा अपघात इतका अचानक झाला की, शोरुममध्ये उपस्थित असलेले लोकही घाबरले.
कारसोबत पडलेल्या महिलेला गंभीर दुखापत झाली. शोरूममधील कर्मचारी आणि कुटुंबातील सदस्यांनी तिला ताबडतोब रुग्णालयात नेले, जिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सध्या जखमी महिलेने किंवा शोरुम मालकाने कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. सध्या ही घटना परिसरात चर्चेचा विषय बनली आहे.
हिरो डॉग! मालकाला वाचवण्यासाठी जळते डायनामाइट तोंडात धरले अन्..; Video पाहून भावूक झाले लोक