शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

नवी दिल्ली विमानतळावरची सेवा पूर्ववत, ड्रोन दिसल्यानं केली होती खंडित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2017 22:22 IST

इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय(आयजीआय) विमानतळावर ड्रोन दिल्यानं मोठी खळबळ उडाली होती

नवी दिल्ली, दि. 20 - इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय(आयजीआय) विमानतळावर ड्रोन दिल्यानं मोठी खळबळ उडाली होती. त्यामुळे विमानतळाची सेवा काही काळासाठी खंडितही करण्यात आली होती. मात्र आता सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. एका पायलटला ड्रोन उडताना दिसल्यानं हा सर्व गोंधळ उडाला होता. त्यानंतर तात्काळ त्यानं एटीसीला याची सूचना दिली. एटीसीच्या सूचनेनुसार विमानसेवा खंडित करण्यात आली होती. विमानतळावरील सर्व तीन रन-वे बंद करण्यात आले होते. या दरम्यान अनेक विमानांच्या मार्गातही बदल करण्यात आला होता. मात्र ड्रोन कोणत्या विमान कंपनीच्या पायलटनं पाहिलं, याची अद्याप माहिती मिळालेली नाही. दहशतवाद्यांच्या धमक्यांमुळे विमानतळ अधिकारी ब-याच सतर्कता घेत असतात. 

ड्रोन या मानवरहीत हवाईअस्त्रापासून असलेल्या संभाव्य धोक्याचा मुकाबला करण्यासाठी फ्रान्सनं लष्कराच्या गरुडसेनेला प्रशिक्षण देण्यात येत आहे. वायव्य फ्रान्समध्ये बॉर्ड्यूपासून 130 किमी अंतरावर असलेल्या मॉन्ट-डी- मर्सान या हवाईतळावर गेल्या जूनपासून ‘गोल्डन ईगल’ जातीच्या चार गरुडांना ड्रोन दिसताच त्यांच्यावर हल्ला करून ते हवेतच नष्ट करण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. या गरुडांच्या कामगिरीचा मध्यावधी आढावा घेण्यात आला व ते शत्रूला नेस्तनाबूत करण्याचे कौशल्य समाधानकारकपणे आत्मसात करीत आहेत, असे प्रशिक्षक कमांडर ख्रिस्तोफ यांनी सांगितले होते.या गरुडांना एकूण दोन वर्षांचे प्रशिक्षण देण्यात येईल. पूर्ण प्रशिक्षित झाल्यावर त्यांनी ड्रोन हवेत दिसताच त्याच्या रोखाने झेप घेऊन त्यांचा हवेतच फडशा पाडावा अशी अपेक्षा आहे. सुरुवातीस या गरुडांना जमिनीवरून झेप घेत समांतर उडण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. नंतर त्यांना ५०० मीटर उंजीवर असलेल्या टाकीवरून लक्ष्यावर कशी झडप घालावी हे शिकविण्यात आले. सर्वात शेवटी त्यांना नजिकच्या पर्वतराजींत नेऊन डोंगराच्या उंच कड्यांवरून खाली दरीमध्ये झेप घेण्याचे प्रशिक्षण दिले जाईल.गेली काही वर्षे फ्रान्स अतिरेकी हल्ल्यांचे लक्ष्य राहिले आहे व अतिरेक्यांनी प्रगत तंत्राचा अवलंब केल्याने असे हल्ले करण्यासाठी ड्रोनचा वापर होण्याचा वास्तववादी धोका सर्वच सुरक्षा यंत्रणांना भेडसावत आहे. या पार्श्वभूमीवर फ्रान्सने हे पाऊल उचलले आहे. विमानतळ, मोठ्या क्रीडा स्पर्धा, आंतरराष्ट्रीय सभा-सम्मेलने अशा संभाव्य धोक्यांच्या ठिकाणी असे तरबेज गरूड संशयास्पद ड्रोनना अचूक टिपण्यासाठी तैनात केले जाऊ शकतील. सुरक्षेसाठी मानवी जवान व विमानांचा वापर करण्याच्या तुलनेत ही गरुडसेना खूपच कमी खर्चिक आहे, याकडेही कमांडक ख्रिस्तोफ यांनी लक्ष वेधले.या पहिल्या तुकडीतील गरुडांना फ्रेच कादंबरीकार अ‍ॅलेक्झांद्रे द््युमास यांच्या ‘थ्री मस्केटीयर्स’ या कादंबरीतील डी‘अर्तागनान, अ‍ॅथॉस, प्रोथॉस आणि अरामिस या लोकप्रिय योद्ध्यांच्या पात्रांची नावे देण्यात आली आहेत. ही पहिली तुकडी प्रशिक्षित झाल्यावर आणखी चार ‘गोल्डन ईगल’ गरुडांना प्रशिक्षित करण्याचाही फ्रान्सचा विचार आहे. ड्रोन्सचा मुकाबला करण्यासाठी गरुडासारख्या शिकारी पक्ष्यांचा वापर करण्याचा विचार करणारा फ्रान्स हा पहिला देश नाही.