शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

15 ऑगस्टपूर्वी 200 रुपयांची नोट चलनात येणार? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2017 17:11 IST

लवकरच तुमच्या खिशात 200 रूपयांची नवी नोट येणार आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये 500 आणि 2000 रूपयांची नोट जारी केल्यानंतर आता भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) 200 रूपयांची नोट जारी करण्याच्या तयारीत

ठळक मुद्देआता भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) 200 रूपयांची नोट जारी करण्याच्या तयारीत आहे.दोनशे रूपयांच्या नोटांची छपाई देखील सुरू झाली असल्याची सुत्रांची माहितीगेल्या महिन्यात झालेल्या एका बैठकीत आरबीआयने 200 रूपयांची नोट बाजारात आणण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. दोनशे रूपयांची नोट एटीएम मशिनमध्ये उपलब्ध होणार नाही असं वृत्त काही दिवसांपूर्वी आलं होतं. पण नव्याने समोर आलेल्या माहितीनुसार  दोनशे रूपयांची नोट एटीएममध्ये उपलब्ध होणार आहे.

नवी दिल्ली, दि. 27 -  लवकरच तुमच्या खिशात 200 रूपयांची नवी नोट येणार आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये 500 आणि 2000 रूपयांची नोट जारी केल्यानंतर आता भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) 200 रूपयांची नोट जारी करण्याच्या तयारीत आहे.  दोनशे रूपयांच्या नोटांची छपाई देखील सुरू झाली असल्याची सुत्रांची माहिती आहे. 200 रूपयांच्या नोटा जारी झाल्या तर गेल्यावर्षी जारी करण्यात आलेल्या 2000 रूपयांच्या नोटांनंतरचं हे दुसरं नवं चलन असेल.

गेल्या महिन्यात झालेल्या एका बैठकीत आरबीआयने 200 रूपयांची नोट बाजारात आणण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. सध्या चलनात असलेल्या नोटांएवढाच आकार 200 रुपयाच्या नोटांचा असेल.  चलनात आल्यानंतर 200 रुपयांच्या नोटांची कमी भासू नये, यादृष्टीने मोठ्या प्रमाणात छपाई सुरू करण्यात आली असल्याचं समजतंय. 

200 रूपयांची नोट कधी चलनात आणायची याबाबतही सरकारचा निर्णय झाला असल्याची सुत्रांची माहिती आहे. 15 ऑगस्टपूर्वी दोनशे रूपयांची नोट चलनात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार दोनशे रूपयांच्या नव्या नोटेची छपाई करताना सुरक्षेच्या दृष्टीने विशेष पावलं उचलण्यात आली आहेत. दोनशे रूपयांच्या नकली नोटा बाजारात येऊ नये यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचंही समजतंय.  

एटीएम मशिनमध्येही मिळणार दोनशे रूपयांची नोट-दोनशे रूपयांची नोट एटीएम मशिनमध्ये उपलब्ध होणार नाही असं वृत्त काही दिवसांपूर्वी आलं होतं. पण नव्याने समोर आलेल्या माहितीनुसार  दोनशे रूपयांची नोट एटीएममध्ये उपलब्ध होणार आहे. 500 आणि 2 हजार रुपयांच्या नव्या नोटा चलनात आल्या त्यावेळी एटीएम मशिनमध्ये बदल करावे लागले. कारण या नोटांच्या आकारात बदल होता. मात्र सध्या चलनात असलेल्या नोटांएवढाच आकार 200 रुपयाच्या नोटांचा असणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे एटीएम मशिनमध्ये काहीही बदल करण्याची गरज भासणार नाही. 

 केंद्र सरकारने 8 नोव्हेंबर 2016 रोजी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. त्यानंतर सरकारने लगेच दोन हजारांची नोट चलनात आणली. लगोलग पाचशे रुपयांची नवी नोटही आणण्यात आली. 200 रुपयांची नोट आणण्याबाबत मात्र कोणत्याही हालचाली झाल्या नव्हत्या; मात्र आता ही नोट आणण्यात येत आहे.