शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा जाहीरनाम्यात नोटाबंदी, जीएसटी, रोजगाराची उपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 06:20 IST

चौकीदार, प्रधानसेवक शब्द गायब; पक्षापेक्षा मोदीच ठरले वरचढ !

- प्रेमदास राठोड ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने सोमवारी जारी केलेल्या जाहीरनाम्यात नोटाबंदी, जीएसटी, रोजगार या गोष्टींना जवळपास फाटा दिला आहे. चौकीदार व प्रधानसेवक हे चर्चेतले दोन्ही शब्द भाजपाच्या जाहीरनाम्यात कुठेही स्थान मिळवू शकले नाहीत. जाहीरनाम्यात पक्षापेक्षा मोदीच वरचढ ठरले आहेत. त्यात मोदींचा उल्लेख ३२ ठिकाणी तर भाजपचा उल्लेख फक्त २० ठिकाणी आहे. याउलट काँग्रेसच्या जाहीरनाम्यात ३० ठिकाणी भाजपचा उल्लेख होता. राहुल गांधी यांचा उल्लेख फक्त ४ ठिकाणी तर काँग्रेसचा उल्लेख तब्बल ४०२ ठिकाणी होता.

काँग्रेसचा २ एप्रिल रोजी जारी केलेला जाहीरनामा ५६ पानांचा तर भाजपाने प्रसिद्ध केलेला जाहीरनामा ४५ पानांचा आहे. मोदी सरकारने नोटाबंदीचा मोठा गाजावाजा केला होता. पण जाहीरनाम्यात फक्त एकाच ठिकाणी नोटाबंदीचा ओझरता उल्लेख आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात नोटाबंदीचा उल्लेख चार ठिकाणी आहे. केंद्रात सत्तेत आल्यापासून जीएसटी हा मोदींसाठी जिव्हाळ्याचा विषय. पण जाहीरनाम्यात फक्त १० ठिकाणी जीएसटीचा उल्लेख आहे. काँग्रेसने २३ ठिकाणी जीएसटीची दखल घेतली आहे. नोकरीच्या मुद्द्याचीही भाजपाने उपेक्षा केली आहे. नोकरी शब्दाचा उल्लेख भाजप जाहीरनाम्यात फक्त ३ ठिकाणी तर काँग्रेस जाहीरनाम्यात ३३ ठिकाणी आहे. भाजप जाहीरनाम्यात आरटीआय शब्द नाही, काँग्रेसने ५१ ठिकाणी आरटीआयची दखल घेतली आहे.

भाजपच्या जाहीरनाम्यात एनडीएचा उल्लेख तिनदा व यूपीएचा उल्लेख ८ वेळा आहे. काँग्रेसने एनडीएचा उल्लेख तीनदा व यूपीएचा उल्लेख १० वेळा आहे. आयात व निर्यात दोन महत्त्वाचे शब्द भाजप जाहीरनाम्यातून गायब आहे. काँग्रेसने १८ ठिकाणी निर्यात व २१ ठिकाणी आयातीचा उल्लेख केला आहे. हेल्थ शब्दाची भाजपाने २३ ठिकाणी तर काँग्रेसने ४७ ठिकाणी दखल घेतली आहे. शाळा व शिक्षण शब्दांच्या नोंदीतही काँग्रेसने भाजपवर मात केली आहे. भाजप जाहीरनाम्यात शाळा शब्द १५ वेळा तर काँग्रेसने २८ वेळा आला आहे. शिक्षण शब्द भाजपकडे ३६ ठिकाणी तर काँग्रेसकडे ५० ठिकाणी आहे. एम्प्लॉयमेंट शब्द भाजप जाहीरनाम्यात १२ ठिकाणी काँग्रेसकडे २४ ठिकाणी आहे. रिक्त जागांचा (व्हेकॅन्सीज) उल्लेख भाजप जाहीरनाम्यात कुठेही नाही. काँग्रेसने त्याची ११ ठिकाणी दखल घेतली आहे. जीडीपीचा उल्लेख भाजप ७ ठिकाणी आणि काँग्रेसने १८ ठिकाणी केला आहे. सीनिअर सिटिझन्सचा उल्लेख भाजपने एकदा व काँग्रेसने ९ वेळा केला आहे.

कृषी, मत्स्यव्यवसाय, इकॉनॉमी, इंडस्ट्री, मनरेगा, सायन्स, पीक, पाकिस्तान, अंतर्गत सुरक्षा, संरक्षण, बॉर्डर या शब्दांच्या उल्लेखातही काँग्रेसने भाजपला मागे टाकले आहे. भाजपने इंडिया शब्द ११७ ठिकाणी तर भारत शब्दाचा उल्लेख ३१ ठिकाणी केला आहे. सर्जिकल स्ट्राइक व एअर स्ट्राइकची भाजपाने दोन-दोन ठिकाणी नोंद घेतली आहे, पण सीआरपीएफ, आर्मी यांचा उल्लेख कुठेही दिसत नाही.वाजपेयी यांची एकाच ठिकाणी दखलभाजपने वाजपेयी यांची एकाच ठिकाणी दखल घेतली आहे. काँग्रेसने इंदिरा गांधी व राजीव गांधी यांचे प्रत्येकी तीनदा उल्लेख केले आहेत. भाजपने अमित शहा व महात्मा गांधी यांची प्रत्येकी दोनदा नोंद घेतली आहे. काँग्रेसने मात्र तीनवेळा महात्मा गांधींचा उल्लेख केला आहे.

टॅग्स :BJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक