शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकरासाठी 'ती' 2 मुलं, पतीला सोडून नेपाळहून भारतात आली पण सत्य समजताच हादरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2023 11:05 IST

नेपाळमधील रहिवासी असलेल्या संगीता देवीने प्रियकर गोविंदसाठी आपल्या पहिल्या पतीला घटस्फोट दिला. त्यानंतर गोविंदशी लग्न केलं.

सीमा हैदरसारखीच एक घटना बिहारच्या दरभंगामध्येही पाहायला मिळाली आहे. नेपाळमधील रहिवासी असलेल्या संगीता देवीने प्रियकर गोविंदसाठी आपल्या पहिल्या पतीला घटस्फोट दिला. त्यानंतर गोविंदशी लग्न केलं. पण गोविंद आधीच विवाहित असून त्याला दोन मुलं आहेत हे तिला माहीत नव्हतं. गोविंद तिच्याकडे दुर्लक्ष करत होता. गोविंद असं का करत होता हे संगीताला कळत नव्हतं. तिने त्याच्या खऱ्या घराचा पत्ता मिळाला. त्यानंतर घरी पोहोचल्यावर तिला धक्का बसला कारण तिच्याशी लग्न करणारा गोविंद आधीच विवाहित असल्याचं समोर आलं.

गोविंदने संगीता आणि पहिल्या पत्नीला घराबाहेर बाहेर काढलं आणि स्वतःहून निघून गेला. हे संपूर्ण प्रकरण दरभंगाच्या बाकरगंज परिसरातील आहे. येथे राहणारा गोविंद एका खासगी बँकेत काम करतो. गोविंदने आठ वर्षांपूर्वी दरभंगा येथील प्रेरणा कुमारीसोबत प्रेमविवाह केला होता. याच दरम्यान, त्यांची रक्सौल येथे बदली झाली. येथील वास्तव्यादरम्यान गोविंदची सोशल मीडियावर नेपाळमधील रहिवासी संगीता हिच्याशी मैत्री झाली.

मैत्रीचे रुपांतर प्रेमात झालं. संगीताने गोविंदला सर्व सत्य सांगितलं की, ती विवाहित असून दोन मुलांची आई आहे. पण गोविंदने त्याचंही लग्न झाल्याची गोष्ट लपवून ठेवली. तिने पतीला घटस्फोट द्यावा असं सांगितलं. मग तो तिच्याशी लग्न करेल असं म्हणाला. संगीताही गोविंदच्या बोलण्यात फसली. तिने आपल्या दोन्ही मुलांना सोडलं आणि पतीपासूनही घटस्फोट घेतला. यानंतर तिने गोविंदसोबत मंदिरात लग्न केलं. ती रक्सौलमध्ये गोविंदसोबत राहू लागली. गोविंदची पोस्टिंग समस्तीपूरमध्ये झाली होती. इथे येताच गोविंद बदलला. 

संगीताशी बोलणं बंद केलं. तो तिच्यापासून अंतर ठेवू लागला. संगीताला ही गोष्ट फार विचित्र वाटली. तिला रक्सौल येथील बँकेच्या शाखेतून गोविंदचा खरा पत्ता मिळाला. पत्ता मिळताच संगीता दरभंगा येथे पोहोचली तेव्हा गोविंदचे लग्न झाल्याचे समजताच तिला धक्काच बसला. पहिली पत्नी प्रेरणाने सांगितलं की, एक मूल एक वर्षाचं आणि एक दोन वर्षांचं आहे. घरात बराच गोंधळ झाला. संगीताने लग्नाचे व्हिडीओ आणि फोटोही दाखवले. यानंतर प्रकरण इतके वाढले की गोविंदने संगीता आणि प्रेरणा यांना घराबाहेर बाहेर काढलं आणि स्वतः फरार झाला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :NepalनेपाळIndiaभारत