शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भारत-नेपाळ सीमेवर कारमध्ये आढळले २८ मानवी सांगाडे!, दोन्ही देशांचे सुरक्षा जवान हादरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2021 18:40 IST

भारतीय सुरक्षा दलाना याप्रकरणाच्या चौकशीला सुरुवात केली असून इतक्या मोठ्या प्रमाणात मानवी सांगाड्यांनी भरलेली एक कार सहजपणे नेपाळमध्ये कशी दाखल झाली?

बिहारच्या अररिया येथे भारत-नेपाळ सीमेवर एकाच जागेवर मोठ्या प्रमाणात मानवी सांगाडे आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. एका कारमध्ये मानवी सांगाडे ठेवण्यात आले होते. सांगाड्यांनी भरलेल्या या कारवर सर्वात आधी नेपाळ सुरक्षा दलाच्या जवानांची नजर पडली. नेपाळच्या जवानांनी तात्काळ याची माहिती सीमेवर तैनात असलेल्या भारतीय जवानांना दिली. कारण ज्या कारमधून इतक्या मोठ्या प्रमाणात मानवी सांगाडे जप्त करण्यात आले आहेत ती कार भारतीय सीमेतून नेपाळमध्ये आली होती. 

भारतीय सुरक्षा दलाना याप्रकरणाच्या चौकशीला सुरुवात केली असून इतक्या मोठ्या प्रमाणात मानवी सांगाड्यांनी भरलेली एक कार सहजपणे नेपाळमध्ये कशी दाखल झाली? असा प्रश्न सुरक्षा अधिकाऱ्यांना पडला आहे. ज्या सीमेवर कार सापडली आहे ती सीमा देखील कोरोनामुळे जवळपास दीड वर्षांपासून पूर्णपणे बंद होती. काही दिवसांपूर्वीच सीमेवरील ये-जा पूर्ववत करण्यात आली आहे. त्यात आता इतक्या मोठ्या प्रमाणात मानवी हाडांनी भरलेली कार सापडल्यानं दोन्ही सुरक्षा दलाचे जवान सतर्क झाले आहेत. 

कशी सापडली हाडांनी भरलेली कार?सुत्रांच्या माहितीनुसार, मानवी सांगाड्यांनी भरलेली कार ४ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सापडली आहे. भारतीय सीमा ओलांडून एक कार नेपाळच्या सीमेत पोहोचली होती. या कारची तपासणी केली असता नेपाळच्या सुरक्षा जवानांना कारमध्ये मानवी हाडांचे सांगाडे सापडले. नेपाळच्या जवानांनी त्याची मोजणी केली असता जवळपास २८ नर सांगाडे सापडले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात सांगाडे पाहून नेपाळचे जवान हादरलेच. त्यांनी तातडीनं भारतीय सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. भारतीय जवान घटनास्थळी पोहोचले असता नेपाळच्या सुरक्षा रक्षकांनी दिलेली माहिती खरी निघाली आणि ते पाहून त्यांनाही आश्चर्याचा धक्काच बसला. जप्त करण्यात आलेल्या हाडांमध्ये बहुतांश मानवी कवटी आणि मांड्यांच्या हाडांचा सर्वाधिक समावेश आहे. दरम्यान, एसएसबीच्या अधिकाऱ्यांनी संबंधित कार भारतातून नेपाळला गेल्याचा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे. एसएसबीची टीम संबंधित घटनेची चौकशी करत आहे. 

टॅग्स :Nepalनेपाळ