शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

नेहरूंनी 8, इंदिरा गांधींनी 50, राजीव यांनी 9, तर...! का आणण्यात आलं 'एक देश एक निवडणूक' विधेयक? भाजपनं स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 16:13 IST

गत काँग्रेस सरकारांनी कलम 356 चा वारंवार गैरवापर केल्याचा इतिहास पाहता, सरकारने 'एक देश, एक निवडणूक' विधेयक आणण्याचा निर्णय घेतला असल्याचे राज्यसभेतील नेते तथा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी म्हटले आहे.

 

'एक देश एक निवडणूक' अर्थात 'वन नेशन, वन इलेक्शन' विधेयक आज (मंगळवार) लोकसभेत सादर करण्यात आले. कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी हे विधेयक लोकसभेत सादर केले. यानंतर, काँग्रेससह विरोधी बाकावरील अनेक पक्षांनी या विधेयकाला विरोध दर्शवला आहे. दरम्यान, गत काँग्रेस सरकारांनी कलम 356 चा वारंवार गैरवापर केल्याचा इतिहास पाहता, सरकारने 'एक देश, एक निवडणूक' विधेयक आणण्याचा निर्णय घेतला असल्याचे राज्यसभेतील नेते तथा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी म्हटले आहे.

भारतीय संविधानाच्या 75 वर्षांच्या गौरवशाली प्रवासासंदर्भात राज्यसभेत सुरू असलेली चर्चा दुसऱ्या दिवशी पुढे घेऊन जाताना नड्डा यांनी काँग्रेसवर थेट हल्ला चढवला. नड्डा म्हणाले, "आज आपण 'एक देश, एक निवडणूक'च्या विरोधात उभे आहात. खरे तर, आपल्यामुळेच 'एक देश, एक निवडणूक' विधेयक आणावे लागले. कारण 1952 ते 1967 या काळात देशात एकाच वेळी निवडणुका होत होत्या. कलम 356 चा वापर करून तुम्ही (काँग्रेस) वारंवार राज्यांतील निवडून आलेली सरकारं पाडली आणि असे करून त्या राज्यांत स्वतंत्र निवडणुकांची परिस्थिती निर्माण केली."

काँग्रेस सरकारांनी कलम 356 चा  90 वेळा वापर केला -भाजपाध्यक्ष नड्डा पुढे म्हणाले, काँग्रेस सरकारांनी कलम 356 चा  90 वेळा वापर केला. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी कलम 356चा 8 वेळा, इंदिरा गांधींनी 50 वेळा, राजीव गांधींनी 9 वेळा, तर मनमोहन सिंग यांनी 10 वेळा कलम 356चा  गैरवापर केला. एवढेच नाही तर, 'राज्यघटनेच्या 75 वर्षांच्या गौरवशाली प्रवासात या गोष्टींचा उल्लेख व्हायला हवा, (लोकांन) माहीत व्हायला हवे की, तुम्ही निवडून आलेल्या सरकारांना एकदा नव्हे तर वारंवार कशा पद्धतीने पाडले आणि देशाला अडचणीत आणले.

आणीबाणीचा उल्लेख करत नड्डा म्हणाले, "देशावर काही संकट आले होते का की देशावर आणीबाणी थोपवली गेली? नाही... देशाला कसलाही धोका नव्हता, खुर्चीला धोका होता. किस्सा खुर्चीचा होता. जिच्यासाठी संपूर्ण देशाला अंधकारात ढकलण्यात आले."

तुम्हाला वेळेपूर्वी सांगतो की, तुम्ही 25 जून 2025 रोजी लोकशाही विरोधी दिनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हा" -नड्डा म्हणाले, "काँग्रेसचे सदस्यं म्हणतात की, त्यांच्या नेत्याने आणीबाणीची चूक मान्य केली आहे, त्यामुळे याचा वारंवार उल्लेख केला जाऊ नये. पण, आणीबाणीच्या काळात लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न झाला. आपल्या मनात जर प्रायश्चित्ताची जराही भावना असे, तर मी आवाहन करतो… आणि तुम्हाला वेळेपूर्वी सांगतो की, तुम्ही 25 जून 2025 रोजी लोकशाही विरोधी दिनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हा." 

उल्लेखनीय आहे की, गेल्या वर्षी सरकारने 25 जून हा 'संविधान हत्या दिन' म्हणून घोषित केला होता. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर 25 जून 1975 ते 21 मार्च 1977 पर्यंत आणीबाणी लादली होती.

टॅग्स :J P Naddaजगत प्रकाश नड्डाBJPभाजपाRajya Sabhaराज्यसभाPoliticsराजकारण