शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 22:13 IST

NEET-UG result, MBBS Admission: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ने शनिवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी एकूण २२.७६ लाख उमेदवारांनी अर्ज केले होते

आज नीट-युजी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये राजस्थानचा महेश कुमार पहिला तर इंदूरचा उत्कर्ष अवधिया दुसला आला आहे. महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा आला आहे. 

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ने शनिवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी एकूण २२.७६ लाख उमेदवारांनी अर्ज केले होते, तर सुमारे २०.८ लाख उमेदवार परीक्षेला बसले होते आणि सुमारे १२ लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ही परीक्षा ४ मे रोजी घेण्यात आली होती. गेल्या वर्षी १३.१५ लाख विद्यार्थी पात्र ठरले होते. मृणाल किशोर झा याची चौथी रँक आली आहे. 

उत्तर प्रदेशमधून सर्वाधिक १.७० लाखांहून अधिक विद्यार्थी पास झाले आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्राचा नंबर आहे. राज्यातून  १.२५ लाखांहून अधिक विद्यार्थी पास झाले आहेत. राजस्थान १.१९ लाख पात्र विद्यार्थ्यांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. पात्र विद्यार्थ्यांमध्ये ७.२ लाखांहून अधिक मुली आहेत, तर ५.१४ लाखांहून अधिक पुरुष आहेत. तसेच यामध्ये ५२९ पात्र विद्यार्थी हे परदेशी नागरिक आहेत, ४०५ अनिवासी भारतीय आहेत आणि ६०६ ओसीआय कार्डधारक आहेत. 

वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी NTA दरवर्षी नीट परीक्षा घेते. या परीक्षेत घोटाळे देखील झालेले आहेत. गेल्या वर्षी नीटवर पेपर लीक आणि खटल्यांसह अनेक अनियमिततांमुळे वादग्रस्त ठरली होती. देशात MBSS अभ्यासक्रमासाठी एकूण १,०८,००० जागा उपलब्ध आहेत, यापैकी सरकारी रुग्णालयांमध्ये ५६,००० तर खाजगी महाविद्यालयांमध्ये ५२,००० जागा आहेत. यामुळे आता प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची कसोटी लागणार आहे. 

परदेशातही होती परीक्षा...भारतातील ५५२ शहरांमध्ये आणि इतर देशांतील १४ शहरांमध्ये असलेल्या ५,४६८ केंद्रांवर एनईईटी आयोजित करण्यात आली होती. अबू धाबी, दुबई, बँकॉक, कोलंबो, दोहा, काठमांडू, कुवेत, लागोस, कौलालंपूर, मनामा, मस्कत, रियाध, शारजाह आणि सिंगापूर या ठिकाणी या परीक्षा घेण्यात आली. 

टॅग्स :NEET EXAM Resultनीट परीक्षेचा निकालdoctorडॉक्टर