NEET UG: देशात बारावीनंतर वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना National Eligibility cum Entrance Test (NEET-UG) उत्तीर्ण करणे आवश्यक असते. National Testing Agency (NTA) दरवर्षी नीट-यूजीचे आयोजन करते. या परीक्षेत चांगला गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना समुपदेशनानंतर MBBS, BHMS यांसारख्या अभ्यासक्रमांत प्रवेश मिळतो.
दरम्यान, नीट-यूजीची संपूर्ण तयारी करूनही ट्रेन उशिरा आल्यामुळे एका विद्यार्थिनीला परीक्षा देता न आल्याने तिचे वर्ष वाया गेले. आता याप्रकरणी भारतीय रेल्वेला त्या विद्यार्थिनीला 9.10 लाख रुपयांची भरपाई द्यावी लागणार आहे.
प्रकरण काय आहे?
उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातील समृद्धी या विद्यार्थिनीने नीट-यूजीसाठी अर्ज केला होता. तिचे परीक्षा केंद्र लखनऊ येथील जय नारायण पीजी कॉलेज होते. परीक्षेच्या दिवशी तिने बस्तीहून इंटरसिटी सुपरफास्ट ट्रेनने प्रवास करण्यासाठी तिकीट काढले. रेल्वेच्या वेळापत्रकानुसार ट्रेन सकाळी 11 वाजता लखनऊला पोहोचणे अपेक्षित होते. मात्र, ती ट्रेन सुमारे अडीच तास उशिरा पोहोचली. परिणामी, समृद्धीला परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचता आले नाही आणि नीट-यूजीची परीक्षा हुकली. यामुळे तिचे एक संपूर्ण शैक्षणिक वर्ष वाया गेले.
उपभोक्ता आयोगात तक्रार
ट्रेन उशिरा पोहोचल्यामुळे परीक्षा देता न आल्याबद्दल समृद्धीने रेल्वेला जबाबदार धरत उपभोक्ता आयोगात तक्रार दाखल केली. तिच्या वकिलांनी रेल्वेकडून 20 लाख रुपयांच्या भरपाईची मागणी केली होती. या प्रकरणी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना नोटीसही बजावण्यात आली.
रेल्वेची चूक मान्य; 9.10 लाखांचा दंड
सुमारे 8 वर्षे चाललेल्या सुनावणीनंतर, उपभोक्ता आयोगाने ट्रेन उशिरा पोहोचल्यामुळे विद्यार्थिनीचे झालेले नुकसान रेल्वेच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचे ठरवले. आयोगाने भारतीय रेल्वेवर 9.10 लाख रुपयांचा दंड ठोठावला असून, ही रक्कम समृद्धीला भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले आहेत. रेल्वेला ही रक्कम 45 दिवसांत अदा करावी लागेल. मुदतीत भरपाई न दिल्यास, 12 टक्के व्याजासह रक्कम देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Web Summary : A student missed her NEET exam due to a delayed train. The Consumer Commission held Indian Railways liable, ordering ₹9.1 lakh compensation for her lost academic year due to the railway's negligence. The compensation must be paid within 45 days.
Web Summary : ट्रेन में देरी के कारण एक छात्रा की NEET परीक्षा छूट गई। उपभोक्ता आयोग ने भारतीय रेलवे को जिम्मेदार ठहराते हुए लापरवाही के कारण उसके शैक्षणिक वर्ष के नुकसान के लिए ₹9.1 लाख मुआवजे का आदेश दिया। मुआवजा 45 दिनों के भीतर देना होगा।