शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

NEET Result 2018:  नीट परीक्षेचा निकाल जाहीर, बिहारची कल्पना कुमारी देशात पहिली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2018 14:18 IST

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षे(NEET)चा निकाल जाहीर झाला आहे.

नवी दिल्ली- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एमडी, एमबीबीएसच्या वैद्यकीय शिक्षणासाठी घेतल्या जाणा-या पात्रता प्रमाणपत्र  परीक्षे(NEET)चा निकाल जाहीर झाला आहे. नीट परीक्षेत 720 पैकी 691 गुण मिळवत कल्पना कुमारी देशात पहिली आली आहे. तर नांदेडचा कृष्णा अग्रवाल देशात सातवा आला असून, त्याला 720 पैकी 685 गुण मिळाले आहेत. देशभरातून 13 लाख 26 हजार 725 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.देशभरात नीट परीक्षेत 13,25,725 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर महाराष्ट्रातून एकूण 1,83,961 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा (सीबीएसई) मार्फत नीट परीक्षा घेतली जाते. या परीक्षेसाठी महाराष्ट्रातूनच सर्वाधिक विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. देशभरातून 13 लाख 26 हजार 725 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.नीटमध्ये पास झाल्यानंतर उमेदवाराला ऑल इंडिया कोटा सीटसंबंधित काऊंसलिंग आणि राज्यस्तरावरील काऊंसलिंग या दोन्हीमध्ये सहभागी होण्याची परवानगी मिळते.ऑल इंडिया कोटा सीटसाठी मेडिकल काऊंसलिंग कमिटी करते. नीट परीक्षा पास झालेले विद्यार्थी ऑल इंडिया कोटा काऊंसलिंगसाठी नोंदणी करू शकतात. परंतु नोंदणी करताना त्यांना डेक्लेरेशन फॉर्ममध्ये स्वतःची माहिती द्यावी लागणार आहे. नोंदणी प्रक्रियाही ऑनलाइन होणार आहे. नीट परीक्षेच्या निकालानंतर आता लगेचच नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे. तर एआयक्यू काऊंसलिंग 12 जून 2018पासून सुरू होणार आहे. मेडिकलच्या परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या राज्यांमध्ये काऊंसलिंगसाठी रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. 

टॅग्स :NEET Result 2018नीट परीक्षा निकाल २०१८CBSE Examसीबीएसई परीक्षा