शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा कहर कायम असल्यानं NEET-PG परीक्षा लांबणीवर; मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 15:59 IST

NEET PG 2021 Exam Postponed by 4 Months Amid Covid 19 Surge: पंतप्रधान मोदींनी बोलावलेल्या बैठकीत झाला महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली: देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्यानं मोदी सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा-पदव्युत्तर (NEET-PG Exam) चार महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. देशातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. त्यात NEET-PG परिक्षेबद्दलचा निर्णय घेण्यात आला. याबद्दलची माहिती आज पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली. (NEET PG 2021 Exam Postponed by 4 Months Amid Covid 19 Surge)कोरोनाच्या वाढत्या संकटाचा सामना कसा करायचा याबद्दल विचारमंथन करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी काल महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली. 'NEET-PG किमान चार महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा ३१ ऑगस्ट २०२१ च्या आधी होणार नाही. परिक्षेच्या तारखेची माहिती १ महिनाभर आधी विद्यार्थ्यांना देण्यात येईल. यामुळे कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आपल्याला अधिक डॉक्टर्स उपलब्ध होतील,' असं प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आलं आहे.देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी परिक्षार्थींकडून करण्यात आली होती. वैद्यकीय शाखेचे विद्यार्थी आणि प्रॅक्टिस करत असलेले डॉक्टर NEET PG परिक्षेला बसतात. ही परिक्षा उत्तीर्ण झालेल्यांना MD/MS/PG डिप्लोमा कोर्ससाठी प्रवेश घेता येतो. एनबीईकडून NEET PG घेतली जाते. याआधी १८ एप्रिलला ही परीक्षा घेतली जाणार होती. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं परिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय NBE नं घेतला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या