शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2024 08:20 IST

दोन पातळीवर चुका झाल्याची सरकारची कबुली.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : नीट परीक्षेबाबतच्या वादानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी याबाबतचा आपला सूर बदलला आहे. यातील दोषींना सोडणार नाहीत, असे स्पष्ट करतानाच त्यांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. विद्यार्थ्यांना त्यांनी आश्वासन दिले की, जो कोणी या प्रकरणात दोषी आढळेल त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल.

ओडिशामधील आपल्या मतदारसंघात प्रधान म्हणाले की, काही विद्यार्थ्यांना कमी वेळेमुळे ग्रेस मार्क दिले गेल्याचे आढळले आहे तर दुसरीकडे दोन ठिकाणी गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे. सरकारने हे प्रकरण गंभीरतेने घेतले असून, विद्यार्थी आणि पालकांनी निश्चिंत राहावे. आम्ही कडक कारवाई करणार आहोत. नॅशनल टेस्टिंग एजन्सीमधील अधिकारीही या प्रकरणात दोषी असल्यास त्यांच्यांवर कठोर कारवाई केली जाईल. कोणत्याही दोषींनी सोडले जाणार नाही. 

न्यायालय नियुक्त अधिकाऱ्यांकडून चौकशी   वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेबाबत वाद सुरू असताना या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांकडून चौकशी करा अशी मागणी माजी मनुष्यबळ विकासमंत्री कपिल सिब्बल यांनी रविवारी केली. तसेच, सरकारने परीक्षा आयोजित करण्याच्या पद्धतींबाबत सर्व राज्यांशी सखोल चर्चा करावी, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

अधिवेशनात जोरदारपणे मुद्दा मांडावा : सिब्बल

आगामी संसदेच्या अधिवेशनात सर्व राजकीय पक्षांनी हा मुद्दा जोरदारपणे मांडावा. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचे कारण देत सरकार चर्चेला परवानगी देणार नाही. त्यामुळे त्यावर चर्चा होण्याची फारशी आशा नाही. गुजरातमधील काही घटनांनी मला धक्का बसला आहे, असे सिब्बल म्हणाले.

गुणवत्तेचे मोजमाप म्हणून सादर केली जाणारी नीट परीक्षा एक घोटाळा आहे. केंद्र सरकारने या परीक्षेची बाजू घेऊ नये. कारण ते विद्यार्थ्यांच्या हिताविरोधात, सामाजिक न्याय आणि गरिबांच्या विरोधात आहे.- एम. के. स्टॅलिन, मुख्यमंत्री, तामिळनाडू

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ची सत्यनिष्ठा आणि नीट परीक्षा आयोजित करण्याच्या पद्धतीवर गंभीर प्रश्न आहे. नीटमध्ये भेदभाव होतो आहे का? गरीब विद्यार्थ्यांना संधीपासून वंचित ठेवले जात आहे का? महाराष्ट्रासारख्या इतर राज्यांनीही नीटबाबत शंका व्यक्त केली आहे.- जयराम रमेश, सरचिटणीस, काँग्रेस 

टॅग्स :NEET EXAM Resultनीट परीक्षेचा निकालCentral Governmentकेंद्र सरकार