शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

नीट परीक्षा ही श्रीमंतांसाठीच, ७ वर्षांत ७० वेळा पेपर फुटले; राहुल गांधींचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 06:59 IST

नीट परीक्षा ही आता फॅशन झाली असून, तुम्ही नीट परीक्षेला व्यावसायिक परीक्षा करून टाकले आहे.

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून आपल्या पहिल्याच भाषणात राहुल गांधींनी नीट-यूजी परीक्षेवरून केंद्र सरकारला घेरले. सरकारने नीट परीक्षेला व्यावसायिक परीक्षा बनविले असून, सरकार पेपरफुटी थांबवू शकलेले नाही. गेल्या ७ वर्षांत ७० वेळा पेपर फुटल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले.

तुम्ही दोन हजार पूर्वीच्या गोष्टी करता, मात्र आता आपण थोडी भारताच्या भविष्याबद्दलही चर्चा करायला हवी. तुम्ही रोजगार याअगोदरच संपविले असून, नोटबंदी आणि जीएसटीने लहान उद्योजक संपले आहेत. तरुणांना सैन्यात नोकरी मिळत होती, मात्र आता अग्निवीर योजना आणली गेली आहे. त्यामुळे नोकरीचा तो मार्गही तरुणांसाठी बंद झाला आहे.

नीट परीक्षा ही आता फॅशननीट परीक्षा ही आता फॅशन झाली असून, तुम्ही नीट परीक्षेला व्यावसायिक परीक्षा करून टाकले आहे. नीट परीक्षेत एखादा विद्यार्थी टॉपर असू शकतो, मात्र जर त्याच्याकडे पैसे नसतील तर तो वैद्यकीय कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ शकत नाही. नीट परीक्षा ही केवळ श्रीमंतांच्या मुलांसाठी तयार करण्यात आली आहे. कोटामध्ये व्यावसायिक क्लासेस सुरू करून या परीक्षेचे केंद्रीकरण करण्यात आले आहे. तेथे हजारो, कोट्यवधी रुपये तयार केले जात आहेत, असे राहुल म्हणाले.

...तर आम्ही सरकारसोबत राहूआजच्या काळात व्यावसायिक शिक्षण इतके महाग झाले आहे की गरीब कुटुंबातील मुलगा त्यात शिकू शकत नाही. विद्यार्थी ६ महिने, वर्षभर नीट परीक्षेची तयारी करतात. नीटच्या विद्यार्थ्यांना यापुढे परीक्षेवर विश्वास राहिलेला नाही. नीट परीक्षेवर मार्ग काढण्यासाठी पूर्ण एक दिवस चर्चा व्हावी. आम्ही यातून मार्ग काढण्यासाठी सरकारसोबत राहू. नीट परीक्षेचे पेपर लीक होणे हे मोठे अपयश आहे. त्यामुळे यावर चर्चेतून मार्ग काढण्याची गरज आहे. मात्र सरकारला यावर  कोणतीही चर्चा करायची नाही, असे राहुल गांधी म्हणाले.

देशामध्ये विविध परीक्षा होत असतात. या परीक्षांबाबत विशेषत: नीट-यूजी, नीट-पीजीबद्दल अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. या परीक्षांमध्ये निर्माण झालेल्या त्रुटींवर तातडीने योग्य तोडगा काढणे आवश्यक आहे. उत्तर प्रदेशसह काही राज्यांमध्ये परीक्षांत घडलेले गैरप्रकार, सरकारी नोकऱ्यांच्या भरतीतील भ्रष्टाचार या गोष्टी अतिशय गंभीर व चिंता वाटण्याजोग्या आहेत. लोकांमध्ये अस्वस्थता, चिंता आणि संताप निर्माण झाला आहे. या प्रकरणात कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे. नीट परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटण्याचे व अन्य गैरप्रकार समोर आल्यामुळे नीट-यूजी परीक्षा वादग्रस्त ठरली आहे. ही परीक्षा पुन्हा घेण्यात यावी अशी मागणी अनेक जणांनी केली आहे.- मायावती, प्रमुख, बसप

टॅग्स :neet exam paper leakनीट परीक्षा पेपर लीकRahul Gandhiराहुल गांधीlok sabhaलोकसभाNarendra Modiनरेंद्र मोदी