शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

नीरव मोदीनं पीएनबी अधिका-यांना लाचेच्या स्वरूपात दिले होते सोने आणि हि-याचे दागिने- सीबीआय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2018 18:35 IST

पंजाब नॅशनल बँकेत तब्बल 12 हजार कोटींचा घोटाळा करून फरार झालेल्या नीरव मोदीसंदर्भात रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत.

नवी दिल्ली- पंजाब नॅशनल बँकेत तब्बल 12 हजार कोटींचा घोटाळा करून फरार झालेल्या नीरव मोदीसंदर्भात रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. नीरव मोदी स्वतःचं काम करवून घेण्यासाठी पीएनबी बँकेच्या अधिका-यांना लाचेच्या स्वरूपात सोने आणि हि-याचे दागिने देत असल्याचं सीबीआयच्या तपासात उघड झालं आहे.सीबीआयनं शनिवारी कोर्टात सांगितलं की, पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबई शाखेतील फॉरेक्स डिपार्टमेंटमध्ये कार्यरत असलेले अधिकारी यशवंत जोशी हे नीरव मोदी याच्याकडून सोने आणि हि-याचे दागिने लाचेच्या स्वरूपात घेते होते. तपासादरम्यान यशवंत जोशींनी हे स्वतः कबूल केल्याचंही सीबीआयनं न्यायालयात स्पष्ट केलं आहे. जोशी यांनी नीरव मोदी याच्याकडून 60 ग्रॅमची दोन सोन्याची नाणी आणि सोने व हि-याचे कानातलेही घेतले होते.देशाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या बँक फसवणुकीच्या या प्रकरणात सीबीआयनं आतापर्यंत 14 लोकांना ताब्यात घेतलं आहे. तर अटकेच्या भीतीनं नीरव मोदी आणि मेहुल चोकसी यांनी आधीच भारतातून पलायन केलं आहे. परंतु ते दोघेही निर्दोष असल्याचा दावा करत आहेत. नीरव मोदीने सीबीआयला तपासात सहकार्य करण्यासाठी नकार दिला आहे. सीबीआयने नीरव मोदीला ई-मेल लिहून तपासात सहभागी होण्यास सांगितलं होतं. यावर नीरव मोदीने स्पष्टपणे नकार दिला. मी परदेशात माझ्या व्यवसायानिमित्त व्यस्त आहे, असं कारण नीरव मोदीने दिलं आहे. यानंतर सीबीआयने पुन्हा एकदा नीरव मोदीला पत्र लिहित पुढील आठवड्यात करण्यात येणा-या चौकशीसाठी हजर राहण्याचा आदेश दिला.सीबीआयने नीरव मोदीला 12,636 कोटी रुपयांच्या घोटाळा तपासात सहभागी होण्यास सांगितलं होतं. नीरव मोदीने दाखवलेल्या उर्मटपणानंतर सीबीआयने पुन्हा एकदा कठोर शब्दांत पत्र पाठवत कारणं चालणार नाहीत असं म्हटलं आहे. कोणत्याही आरोपीला तपासात सहभागी करून घेण्यासाठी कळवणं गरजेचं असतं. सीबीआयने नीरव मोदीला ज्या देशात असशील तेथील भारतीय दूतावासाला संपर्क साधण्यास सांगितलं होतं. त्याची भारतात येण्याची व्यवस्था केली जाईल. याआधी नीरव मोदीने आपल्या वकिलाच्या माध्यमातून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईल की नाही अशी शंका व्यक्त केली होती. जोपर्यंत निष्पक्ष चौकशीचं आश्वासन दिलं जात नाही तोपर्यंत आपण भारतात येण्याचा निर्णय घेऊ शकत नाही, असं नीरव मोदीने म्हटलं होतं.दुसरीकडे सीबीआयने पीएनबी आर्थिक घोटाळ्याप्रकरणी बँकेचे मुख्य परीक्षक (चिफ ऑडिटर) एम के शर्मा यांना अटक केली. बँकेच्या कर्मचा-याची ही पहिली अटक असल्याचं सांगितलं जात आहे. बँकेच्या लेखा परीक्षणाचे ते प्रमुख होते. इतका मोठा घोटाळा लेखा परीक्षकांच्या लक्षात यायलाच हवा होता. तो त्यांच्या लक्षात आला नाही की, त्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं हे सीबीआय तपासून पाहत आहे. घोटाळ्यात त्यांची काही भूमिका नव्हती ना, हेदेखील तपासून पाहिलं जात आहे. 

टॅग्स :Nirav Modiनीरव मोदीPunjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळा