शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
2
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
3
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
4
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
5
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी
6
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
7
टीनएजर्ससाठी अलर्ट! सुंदर दिसण्याची हौस भलतीच महागात; 'स्किनकेअर'ची क्रेझ धोकादायक
8
IND vs AUS : टिम डेविडची वादळी खेळी! पठ्ठ्यानं मोडला सूर्या दादाचा मोठा विक्रम
9
कामगाराच्या खात्यात चुकून आले ₹८७,०००००, त्याने बोनस म्हणून उडवले, बॉसवर आली डोक्यावर हात मारण्याची वेळ 
10
iPhone 16: आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर २५००० रुपये वाचवा; कुठं मिळतोय इतका स्वस्त?
11
६० का लगता नही कहीं से! अक्षय कुमारच्या शाहरुखला हटके शुभेच्छा; म्हणाला, "शकल से ४०..."
12
"56 इंचाची छाती असून, अमेरिकेपुढे झुकतात", राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
13
युक्रेनकडून रशियावर भीषण ड्रोनहल्ला, तुआप्से बंदरात घडवला मोठा विध्वंस, ऑईल टर्मिलन जळाले  
14
PM किसानचा २१वा हप्ता कधी येणार? मोठी अपडेट समोर! 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाहीत २००० रुपये
15
‘सत्याचा मोर्चा’त शरद पवारांचे विधान; शिंदे गटाचे नेते म्हणाले, “५० वर्ष सत्ता भोगली...”
16
मुंबईतील कॉन्सर्टवेळी 'मिस्ट्री मॅन'सोबत दिसली मलायका अरोरा, नेटकरी म्हणाले, "अर्जुनपेक्षा भारी..."
17
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
18
IND-W vs SA-W Final : टॉस आधी पावसाची बॅटिंग! मेगा फायनलमध्ये ५०-५० षटकांचा खेळ होणार का?
19
रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?
20
तंत्रज्ञानाची किमया! चित्रपट पाहत असताना...; Apple वॉचमुळे वाचला २६ वर्षीय तरुणाचा जीव

"...तोपर्यंत चहा उकळत राहील"; हुंड्यासाठी छळाचा आरोप, तरुणाने सासरीच सुरू केली टपरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 15:06 IST

कृष्णकुमार धाकड याने त्याच्या चहाच्या टपरीचं नाव आयपीसीच्या कलम ४९८अ वरून "४९८अ टी कॅफे" असं ठेवलं आहे.

मध्य प्रदेशातील नीमच जिल्ह्यातील अठाना परिसरातील रहिवासी कृष्णकुमार धाकड हा त्याची यूपीएससीची तयारी सोडून राजस्थानमधील बारन जिल्ह्यातील अंता येथे चहाची टपरी चालवत आहे. या दुकानाचा उद्देश केवळ चहा विकणे किंवा पैसे कमवणे नाही, तर त्यामागे धाकड याच्या आयुष्यात घडलेली एक धक्कादायक घटना आहे, ज्यामुळे त्याला असं मोठं पाऊल उचलावं लागलं.

कृष्णकुमार धाकड याने त्याच्या चहाच्या टपरीचं नाव आयपीसीच्या कलम ४९८अ वरून "४९८अ टी कॅफे" असं ठेवलं आहे. त्याने चहाच्या दुकानावरील बॅनर आणि होर्डिंग्जवर घोषणा लिहिल्या आहेत आणि न्यायाची मागणी केली आहे. ज्यामध्ये लिहिलं आहे की, 'न्याय मिळेपर्यंत चहा उकळत राहील'. चला चहावर चर्चा करूया... असंही म्हटलं आहे. पत्नीने छळ आणि हुंड्याच्या खोट्या प्रकरणात अडकवल्यामुळे त्याने न्याय मागितला आहे.

नीमच जिल्ह्यातील जावद तहसीलच्या अठाना नगर येथील रहिवासी केके धाकड याच जुलै २०१८ मध्ये राजस्थानमधील अंता येथील एका मुलीशी लग्न झालं होतं. २०१९ मध्ये केके धाकड याने पत्नी अंता यांच्याकडून मधमाशी पालनाचे प्रशिक्षण घेतलं. दोघांनीही अठाना परिसरातूनच मधमाशी पालन सुरू केलं. त्यानंतर व्यवसाय हळूहळू वाढू लागला. धाकड आणि त्यांच्या पत्नीने महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक बेरोजगार महिलांना रोजगार देण्यास सुरुवात केली.

८ एप्रिल २०२१ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मध्य प्रदेशात पहिल्यांदाच महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणाऱ्या या कार्याचं कौतुक केलं. सुमारे १ वर्षात मधमाशी पालन व्यवसायाला इतकी गती मिळाली की दूरवर मधाची मागणी वाढली, परंतु २०२२ मध्ये कृष्णकुमार धाकड याच्या आयुष्यात एक वळण आलं, जिथून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. 

ऑक्टोबर २०२२ मध्ये  पत्नी अचानक नाराज झाली आणि तिच्या माहेरी गेली. त्यानंतर मधाचा व्यवसाय ठप्प झाला. काही महिन्यांनंतर केकेच्या पत्नीने घरगुती हिंसाचार आणि हुंड्याचा छळ केल्याबद्दल आयपीसीच्या कलम ४९८अ आणि पोटगीच्या कलम १२५ अंतर्गत न्यायालयात खटला दाखल केला. धाकडने एक अनोखं पाऊल उचललं आणि त्यांच्या सासरच्या घरासमोरच ४९८अ  नावाने चहाची टपरी सुरू केली.

गेल्या ३ वर्षांपासून मी एका खोट्या प्रकरणात अडकलो आहे आणि न्यायासाठी राजस्थानातील अंता जिल्ह्यात दारोदारी भटकत आहे. माझी एक आई वृद्ध आहे, जिचा मी एकमेव आधार आहे. सर्व काही उद्ध्वस्त झाल्यानंतर मला एका शेडमध्ये राहावे लागते. मला केवळ मानसिकच नाही तर सामाजिक छळालाही तोंड द्यावं लागत आहे. अनेक वेळा मी आत्महत्या करण्याचा विचार केला, पण नंतर मला माझ्या आईची आठवण येते. आता  मी '४९८अ टी कॅफे'च्या नावाखाली चहा विकून कायद्याशी लढत राहीन असं कृष्णकुमार धाकड याने म्हटलं आहे.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशdowryहुंडाCrime Newsगुन्हेगारी