विनासुईची कोरोना लस पुढच्या वर्षी उपलब्ध होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 05:00 AM2021-03-18T05:00:06+5:302021-03-18T07:18:53+5:30

सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले की, कोरोनाच्या नव्या प्रकारच्या विषाणूंना प्रतिबंध करण्यासाठी विविध औषध कंपन्यांनी लसींवर आणखी संशोधन सुरू केले आहे.

The needleless corona vaccine is expected to be available next year | विनासुईची कोरोना लस पुढच्या वर्षी उपलब्ध होण्याची शक्यता

विनासुईची कोरोना लस पुढच्या वर्षी उपलब्ध होण्याची शक्यता

Next

वॉशिंग्टन : विनासुईची तसेच सामान्य तापमानात साठवणूक करता येणारी नवीन कोरोना लस या वर्षाच्या अखेरीपर्यंत किंवा पुढच्या वर्षी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. ही माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी दिली. त्यांनी सांगितले की, आता उपलब्ध असलेल्या कोरोना लसींमुळेही योग्य उपचार होत आहेत. मात्र आणखी कोरोना लसी विकसित करणेही आवश्यक आहे. नव्या सहा ते आठ लसींच्या मानवी चाचण्या काही महिन्यांत पूर्ण होणार आहेत.  (The needleless corona vaccine is expected to be available next year)

सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले की, कोरोनाच्या नव्या प्रकारच्या विषाणूंना प्रतिबंध करण्यासाठी विविध औषध कंपन्यांनी लसींवर आणखी संशोधन सुरू केले आहे. कोरोना विषाणूत होणारे परिवर्तन तसेच या साथीचा वेगाने होणारा फैलाव यांना रोखण्यासाठी जास्तीत जास्त प्रभावी औषधे व लसी उपलब्ध होणे गरजेचे आहे. जगभरातील फक्त १२२ देशांमध्ये कोरोना लसीकरण मोहीम राबविली जात आहे. 

Web Title: The needleless corona vaccine is expected to be available next year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.