शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

एकदा पाकिस्तानसोबत आरपारची लढाई झालीच पाहिजे - रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2018 13:48 IST

पाकिस्तानकडून वारंवार होणा-या शस्त्रसंधी उल्लंघनावर बोलताना आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले यांनी एकदा तरी पाकिस्तानसोबत आरपार लढाई झाली पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे

नवी दिल्ली - पाकिस्तानकडून वारंवार होणा-या शस्त्रसंधी उल्लंघनावर बोलताना आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले यांनी एकदा तरी पाकिस्तानसोबत आरपार लढाई झाली पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे. पाकिस्तानी लष्कराने राजौरी व पूंछ जिल्ह्यात केलेल्या गोळीबारात चार जवानांना वीरमरण आल्याच्या वृत्ताने देशभर संतापाची लाट उसळली असून, पाकला आता जोरदार अद्दल घडवा, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे. पाकिस्तान सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत असताना भारताने गप्प न बसता, पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून अतिरेकी व पाक सैनिक यांचे अड्डे व बंकर्स संपवून टाकावेत, अशी चर्चा सामान्यांमध्येही सुरू होती. सोमवारी बीएसएफचा एक अधिकारीही पाकच्या हल्ल्यात जखमी झाला.

'मला वाटतं पाकिस्तानसोबत एकदा आरपार लढाई झाली पाहिजे. आम्ही मैत्री करण्यास इच्छुक आहोत. पण एकदा पाकिस्तानला धडा शिकवलाच पाहिजे', असं रामदास आठवलेंनी म्हटलं आहे. 

पाकिस्तानच्या हल्ल्यामुळे सीमा रेषा व प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील २४ गावे पूर्णपणे रिकामी करण्यात आली आहेत, तसेच ८४ शाळाही ३ दिवसांपासून बंद आहेत. हल्ल्याच्या भीतीने लोकांचे स्थलांतर सुरू असून, पाकला त्यांच्या घरात घुसून संपवा, अशी मागणी स्थानिकही करीत आहेत. आतापर्यंत ९0 स्थानिक पाकच्या गोळीबारात जखमी झाले आहेत.

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, गृहराज्यमंत्री हंसराज अहिर आणि भारतीय सैन्यदलाचे उपप्रमुख ले. जनरल शरत चंद यांनी आम्ही गप्प बसणार नाही आणि पाकला धडा शिकवू, असा इशारा दिला आहे. ले. जनरल शरत चंद म्हणाले की, भारतीय सैन्य पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत आहे. बदला न सांगता घेतला जात असतो. आम्ही अधिक बोलणार नाही. आमची कारवाईच काय ते बोलेल. अतिरेक्यांच्या घुसखोरीला पाकिस्तानी सैन्याची फूस असल्याचे सांगून, ते म्हणाले की, पाकिस्तानला आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ. गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले आहेत, ‘भारतीय सैन्याच्या शौर्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे.’

जवानांचे पार्थिव घरीपाकिस्तानने काल केलेल्या हल्ल्यात जे जवान शहीद झाले, त्यांचे पार्थिव सोमवारी त्यांच्या घरी पाठविण्यात आले. २ जवान काश्मीरच्या कठुआ व सांबा येथील होते, तर १ जवान मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरचा होता. कॅप्टन कपिल कुंडू यांचे पार्थिव दिल्लीला आणून तेथून गुरगावला नेण्यात आले. दिल्लीत संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन व लष्करप्रमुखांनी विमानतळावर पार्थिवाचे दर्शन घेतले व त्यांना आदरांजली वाहिली. 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेPakistanपाकिस्तान