शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

नीट परीक्षेचे प्रवेशपत्र दोन दिवसांत जारी करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 07:09 IST

एनटीएने सोमवारी रात्रीच जेईई मेन परीक्षेसाठीचे प्रवेश जारी केले असून, शनिवारपर्यंत ‘नीट’ परीक्षेसाठी प्रवेशपत्र (अ‍ॅडमिट कार्ड) जारी केले जातील.

एस. के. गुप्ता नवी दिल्ली : वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा ठरल्या वेळीच होईल, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर राष्टÑीय परीक्षा संस्था प्रवेश परीक्षा घेण्याच्या तयारीला लागली आहे. एनटीएने सोमवारी रात्रीच जेईई मेन परीक्षेसाठीचे प्रवेश जारी केले असून, शनिवारपर्यंत ‘नीट’ परीक्षेसाठी प्रवेशपत्र (अ‍ॅडमिट कार्ड) जारी केले जातील.नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे (एनटीए) महासंचालक डॉ. विनीत जोशी यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, नीट परीक्षा १३ सप्टेंबर रोजी आॅफलाईन घेण्यात येणार आहे. नीट परीक्षेसाठी १५.९७ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, देशभरात ३,८५० परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेतली जाईल.कोविड-१९ च्या साथीमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर वेळेत येण्यास सांगण्यात आले आहे. पालकांना परीक्षा केंद्राबाहेर गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परीक्षा केंद्रात प्रवेश देण्याआधी विद्यार्थ्यांचे शारीरिक तापमान तपासण्यात येणार आहे. ताप जास्त असल्यास परीक्षा देण्यास मनाई केली जाईल. कोविड-१९ च्या नियमांचे उल्लंघन होणार नाही, यादृष्टीनेही मार्गदर्शक निर्देश तयार केले जात आहे, असे त्यांनी सांगितले.>८.५ लाख परीक्षार्थींजेईई मेन परीक्षा सलग सहा दिवस दोन सत्रांत आयोजित करण्यात आली असून, ८.५ लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. नीट परीक्षा एकाच दिवशी आणि एकाच वेळी आयोजित केली जाणार आहे. जेईई मेन परीक्षा आॅन स्क्रीन संगणकआधारित असेल, तर नीट परीक्षा आॅफलाईन (पेन-पेपर) घेतली जाणार आहे.