कोकराजार : कोकराजार येथील १४ जणांच्या हत्याकांडामागे नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रंट आॅफ बोडोलँड (एनडीएफबी) असल्याची आमच्याकडे जी माहिती व पुरावे आले आहेत त्यावरून दिसते, असे आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी येथे रविवारी सांगितले. हत्याकांड झाले त्याठिकाणाला भेट दिल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. पाच आॅगस्ट रोजी हल्लेखोरांनी १४ नागरिकांची हत्या केली होती. झालेली घटना अत्यंत दुर्देवी असून कोणत्याही अपराध्याला सोडले जाणार नाही. आम्ही आधीच कठोर भूमिका घेतली असून कारवार्ई सुरूही केली आहे. आम्ही घटनेमागे जे असतील त्यांना शोधून काढ. लोकांचे जीवित आणि मालमत्तेचे संरक्षण करण्यास आमचे सरकार बांधील असून व दहशतवाद अजिबात मान्य नसल्याचे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)
१४ जणांच्या हत्येमागे एनडीएफबी : सोनोवाल
By admin | Updated: August 8, 2016 04:35 IST