शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

राज्यसभेत एनडीए आता सर्वांत मजबूत स्थितीत; पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 06:37 IST

असे असले तरी २४५ सदस्यांच्या सभागृहात बहुमताची १२३ सदस्यसंख्या गाठण्यासाठी आणखी २२ जागा जिंकण्याची गरज आहे.

नितीन अग्रवाल नवी दिल्ली : राज्यसभा निवडणुकीनंतर संसदेच्या वरिष्ठ सभागृहात भाजप व एनडीएची ताकद वाढली आहे. १९ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत ८ जागा जिंकून एनडीएची सदस्य संख्या प्रथमच तीन अंकी झाली आहे. यापूर्वीही भाजपने कर्नाटक व अरुणाचल प्रदेशातील पाचपैकी ३ जागा बिनविरोध जिंकलेल्या आहेत. अशा प्रकारे ७५ जागा असलेल्या भाजपची संख्या आता ८६ व निवडणुकीपूर्वी ९० जागा असलेल्या एनडीएची सदस्यसंख्या आता १०१ झाली आहे. इतिहासात प्रथमच एनडीए एवढ्या मजबूत संख्येवर राज्यसभेत पोहोचला आहे. असे असले तरी २४५ सदस्यांच्या सभागृहात बहुमताची १२३ सदस्यसंख्या गाठण्यासाठी आणखी २२ जागा जिंकण्याची गरज आहे.राज्यसभेत ६५ सदस्यीय यूपीएमध्ये काँग्रेसचे ४४ सदस्य आहेत. त्याबरोबरच राष्टÑवादी ४, आरजेडी ५, डीएमके ७, पीडीपी २, जेडीएस २ व जेएमएमचा एक सदस्य आहे. याशिवाय शिवसेनेच्या सदस्यांची संख्या यात जोडली तर ही संख्या आणखी तीनने वाढेल. या संख्याबळावर राज्यसभेमध्ये सत्ताधारी एनडीएशी मुकाबला करण्यासाठी यूपीएला संघर्ष करावा लागणार आहे.१० राज्यांतील २४ जागांसाठी राज्यसभेची निवडणूक २६ मार्च रोजी होणार होती. परंतु त्यातच लॉकडाऊन जाहीर केल्याने या निवडणुका स्थगित करण्यात आल्या. कर्नाटकच्या चार व अरुणाचल प्रदेशच्या एका जागेसह एकूण पाच जागी प्रत्येकी एकेकच उमेदवाराने अर्ज दाखल केल्याने तेथील निवडणुका बिनविरोध झाल्या. त्यात माजी पंतप्रधान व जेडीएस नेते एच. डी. देवेगौडा, काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे व भाजप नेते इरन्ना कडाडी व अशोक गस्ती यांचा समावेश होता. याशिवाय अरुणाचल प्रदेशातून भाजपचे नबाम रेबिया यांनाही बिनविरोध निर्वाचित घोषित करण्यात आले. या २४ जागांसह यावर्षी राज्यसभेच्या एकूण ६१ जागांवर निवडणूक झालेली आहे.>एनडीएचे आता १0१ सदस्यकोरोना लॉकडाऊननंतर झालेल्या निवडणुकीत मजबूत स्थितीत पोहोचलेल्या एनडीएला बिजू जनता दल, वायएसआर काँग्रेस व एआयडीएमके यासारख्या गैर-यूपीए पक्षांची मदत मिळाली तर वरिष्ठ सभागृहात कोणताही कायदा मंजूर करणे सोपे जाईल. सध्या तरी भाजपच्या नेतृत्वातील एनडीएच्या १०१ सदस्यांत भाजपचे ८६ सदस्य आहेत. याशिवाय जनता दल युनायटेड ५, शिरोमणी अकाली दल ३ व लोकजनशक्ती पार्टी, बोडो लँड पीपल्स फ्रं ट, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया, आसाम गण परिषद, पीएमके व तमिळ मनिला काँग्रेसचा प्रत्येकी एक सदस्य आहे. याशिवाय नॅशनल पीपल्स पार्टीचाही (एनपीपी) एक सदस्य आहे.

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभा