शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारचं शेतकऱ्यांना गिफ्ट, लवकरच देणार 3 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2019 13:51 IST

पाच राज्यांतील निवडणुकीच्या निकालानंतर मोदी सरकार खडबडून जागं झालं आहे.

ठळक मुद्देमोदी सरकार शेतकऱ्यांना नवनव्या योजना उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. एनडीए सरकार संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना एक जबरदस्त पॅकेज देण्याच्या तयारीत आहे. शेतकऱ्याला 3 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्यात येणार आहे.

नवी दिल्ली-  पाच राज्यांतील निवडणुकीच्या निकालानंतर मोदी सरकार खडबडून जागं झालं आहे. तीन राज्यांत भाजपाला शेतकऱ्यांची नाराजी भोवल्यानंच सत्ता गमवावी लागल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्याच पार्श्वभूमीवर मोदी सरकार शेतकऱ्यांना नवनव्या योजना उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना एक जबरदस्त पॅकेज देण्याच्या तयारीत आहे. त्यावर सध्या कामही सुरू आहे.विशेष म्हणजे या योजनेंतर्गत शेतकऱ्याला 3 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्यात येणार आहे. येत्या शेवटच्या बजेटमध्ये याची घोषणा होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी शेतकऱ्याला 1 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्यावर सरकार विचार करत होते. परंतु आता शेतकऱ्याला थेट 3 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळावे, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मिळालेल्या माहितीनुसार कृषी मंत्रालय यासंदर्भात नीती आयोगाशी चर्चा करणार आहे. त्यानंतर या योजनेवर शिक्कामोर्तब करण्यात येऊ शकते. मोदी सरकारच्या या योजनेचा छोटछोट्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. ज्या शेतकऱ्यांनी मुदतीत कर्ज फेडलं आहे. त्यांना सध्या सरकार कर्ज वाटप करत आहे. कर्जमाफीनंतर बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास कचरतायत. परंतु सरकारनं मध्यस्थी केल्यानं बँका शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज देऊ शकतात. या वर्षाच्या शेवटच्या बजेटमध्ये या योजनेची घोषणा होण्याची शक्यता आहे.सरकारमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं यासंदर्भात बँक अधिकाऱ्यांशी बातचीतही केली आहे. जोपर्यंत सरकार क्रेडिट गॅरंटी यंत्रणा लागू करत नाही, तोपर्यंत बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास तयार नाहीत. बँकर्स आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया राज्यांद्वारे शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कर्जमाफीच्या विरोधात आहेत. तसेच केंद्र सरकारनं या योजनेसंदर्भात सर्व मंत्रालयांकडून अभिप्राय मागवला आहे. त्यानुसारच फेब्रुवारीमध्ये सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात त्याची घोषणा होऊ शकते. सीबीआयच्या रिपोर्टनुसार, शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यानं ही समस्या सुटणार नाही. तसेच शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढले यावर भर दिला पाहिजे. 

टॅग्स :Farmerशेतकरी