शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा? बिहारला ना एकत्र गेले, ना एकत्र आले, एकमेकांकडे पाहून कोरडंच हसले; नेमके काय घडले? 
2
'एनडीएने बिहारची मते ५.५ रुपये प्रतिदिन दराने खरेदी केली', प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
3
'मुलगा गोरा कसा?'; संशयी पतीने क्रौर्याची सीमा ओलांडली! बाळाच्या रंगावरून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला अन्.. 
4
कराची शेअर बाजारात तेजी... पाकिस्तानची सर्वात मोठी कंपनी कोणती? रिलायन्सच्या तुलनेत कुठे?
5
Mumbai Crime: ऑफिसमधून बाहेर पडताच कारच्या समोरून आले आणि घातल्या गोळ्या; मुंबईतील घटनेचा व्हिडीओ आला समोर
6
Jara Hatke : जगातील अद्भुत कोपरा, जिथे सूर्य दोन महिने 'सुट्टीवर' जातो; तापमानही जाते शून्याच्या खाली!
7
Numerology 2026: ६ मूलांकांचे दु:खाचे दिवस सरणार, सुवर्ण काळ येणार; २०२६ला मालामाल-भाग्योदय!
8
उदयपूरमध्ये शाही विवाह सोहळा, ज्युनियर ट्रम्पपासून VVIP पाहुणे येणार; कोण आहे वधू आणि वर?
9
Smriti Mandhana : समझो हो ही गया... स्मृती मंधानाने केली साखरपुड्याची अनोखी घोषणा, रविवारी होणार विवाह
10
किलर स्माईल ते किलर्स स्माईल! माधुरी दीक्षितची सस्पेन्स सीरिज 'या' दिवशी होणार रिलीज
11
एकनाथ शिंदेंकडून दिल्लीत तक्रार पण मंत्री उदय सामंतांनी रवींद्र चव्हाणांचं केलं भरभरून कौतुक
12
धक्कादायक! शाळेच्या छतावरून उडी घेऊन १३ वर्षीय विद्यार्थिनीने आयुष्य संपवले, नेमके कारण काय?
13
असं काय झालं की, लग्नाला फक्त ३ दिवस बाकी असताना नवरदेवाने संपवले आयुष्य; ४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
14
"युट्यूबमधून मी जास्त पैसे कमावते...", फराह खानचा खुलासा; कोरिओग्राफी-दिग्दर्शनाबद्दल म्हणाली...
15
Jalana: १३ वर्षीय विद्यार्थिनीने शाळेतच संपवले जीवन; पालकांचा शिक्षकावर गंभीर आरोप
16
"जर मी तिला शाळेत पाठवलं नसतं तर..."; चौथ्या मजल्यावरुन उडी मारलेल्या अमायराच्या आईचा टाहो
17
मोमोजचा व्यवसाय, प्रचंड मेहनती, नवीन फ्लॅटही घेतला; साहिलने जे कमावलं ते ड्रायव्हिंगने गमावलं
18
The Family Man 3 Review: 'श्रीकांत तिवारी'वरच 'टास्क फोर्स'ला संशय; या मिशनमध्ये 'द फॅमिली मॅन' पास की फेल? वाचा रिव्ह्यू
19
Pune Accident: ताम्हिणी घाटात जीप ५०० फूट दरीत कोसळली, ६ तरुणांचा मृत्यू
20
IND vs SA: भारताला मोठा धक्का! शुबमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, अनुभवी खेळाडूला कर्णधारपद
Daily Top 2Weekly Top 5

'एनडीएने बिहारची मते ५.५ रुपये प्रतिदिन दराने खरेदी केली', प्रशांत किशोर यांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 13:25 IST

नितीश कुमार स्वतः प्रामाणिक आहेत, पण त्यांच्या नावाने भ्रष्टाचाराचा खेळ खेळला जात आहे. एनडीए मते खरेदी करून प्रचंड विजयाचा दावा करत आहे, असंही प्रशांत किशोर म्हणाले.

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएच्या विजयावर आणि जन सुराजच्या पराभवावर प्रशांत किशोर यांनी प्रतिक्रिया दिला. 'जनतेची मते विकत घेण्यात आली. निवडणुकीदरम्यान महिलांच्या खात्यात दहा हजार रुपये पाठवण्यात आले आणि जीविका दिदींना त्यांच्या मदतीसाठी तैनात करण्यात आले. नितीश कुमार स्वतः प्रामाणिक आहेत, परंतु त्यांच्या नावाने भ्रष्टाचार केला जात आहे. मतांसाठी जागतिक बँकेचे कर्जाचे पैसे वळवून सार्वजनिक खात्यात पाठवण्यात आले. ज्या गरीब लोकांची मुलांची स्वप्ने हिरावून घेण्यात आली त्यांच्यावरील हा अन्याय आहे. जन सुराजला थांबवता येणार नाही, अशी प्रतिक्रिया प्रशांत किशोर यांनी दिली.

एकनाथ शिंदेंकडून दिल्लीत तक्रार पण मंत्री उदय सामंतांनी रवींद्र चव्हाणांचं केलं भरभरून कौतुक

प्रशांत किशोर गुरुवारी चंपारणमधील भितिहरवा येथील गांधी आश्रमात गेले होते. तिथे  त्यांनी विधानसभा निवडणुकीत जन सुराजच्या पराभवानंतर मौन केले. दरम्यान, आज शुक्रवारी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. गेल्या सहा ते सात दिवस खूप कठीण होते. कारण जन सुराजचा पराभव नव्हता, तर बिहारमधील लोकांची मते दररोज साडेपाच रुपये दराने खरेदी केली जात होती ही धारणा होती. हा लोकशाहीवरील अन्याय आहे, असा आरोप प्रशांत किशोर यांनी केला.

'जन सुराज विचारसरणीशी संबंधित लोकांसाठी हे गांधी आश्रम प्रेरणास्थान आहे. "येथून, आम्ही आमची वाटचाल सुरू केली आणि जन सुराज लाखो लोकांचे कुटुंब बनले," असे ते म्हणाले. बिहारमध्ये बरेच काही बदलू शकेल अशी आशा निर्माण झाली. पण लोकशाहीचा पाया, मत, विकत घेतले गेले. देशाच्या ७५ वर्षांच्या इतिहासात अशी ही पहिलीच घटना आहे, असा दावा त्यांनी केला.

भारत हा अशा काही मोजक्या देशांपैकी एक आहे तिथे सुरुवातीपासूनच सर्वांना मतदानाचा अधिकार आहे. निवडणुकीपूर्वी सरकारने एक योजना सुरू केली त्या अंतर्गत दहा हजार रुपये देण्यात आले. पैसे मिळाल्यानंतर कोणीही आपले मत बदलू नये यासाठी सरकारी यंत्रणा उभारण्यात आल्या. त्यांनी दुसऱ्याला मतदान करू नये यासाठी कडक देखरेख ठेवण्यात आली. यामुळे लक्षणीय बहुमत मिळाले. बिहार निवडणुकीच्या निकालाचा परिणाम संपूर्ण देशावर होईल. जर हे मान्य केले तर सत्तेत असलेला पक्ष कधीही निवडणूक हरणार नाही, असे विधान प्रशांत किशोर यांनी केले.

English
हिंदी सारांश
Web Title : NDA bought Bihar votes for ₹5.5 daily: Prashant Kishor

Web Summary : Prashant Kishor alleges NDA bought Bihar votes by distributing money through government schemes. He claims ₹5.5 per day was the rate, calling it an injustice and threat to democracy. He fears this will impact national elections.
टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरBiharबिहारBihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५