शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपा आणि काँग्रेस दोघांना खूश ठेवण्याचा केला प्रयत्न ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2017 13:48 IST

गुजरात राज्यसभा निवडणुकीत भाजपाने आपली संपूर्ण ताकत पणाला लावूनही काँग्रेसचे चाणक्य अहमद पटेल विजयी झाले.

ठळक मुद्देकंधाल जाडेजा यांनी भाजपाच्या बाजूने तर, जयंत पटेल यांनी काँग्रेसच्या बाजूने मतदान केले.  जयंत पटेल आनंद जिल्ह्यातील उमरेठ मतदारसंघाचे आमदार आहेत.

सूरत, दि. 10 - गुजरात राज्यसभा निवडणुकीत भाजपाने आपली संपूर्ण ताकत पणाला लावूनही काँग्रेसचे चाणक्य अहमद पटेल विजयी झाले. या राज्यसभा निवडणुकीत प्रत्येक एक मत महत्वाचे असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन आमदारांनी भाजपा आणि काँग्रेस दोघांच्या बाजूने मतदान केले. कंधाल जाडेजा यांनी भाजपाच्या बाजूने तर, जयंत पटेल यांनी काँग्रेसच्या बाजूने मतदान केले. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेस आणि भाजपा दोघांना खूश ठेवण्याचा प्रयत्न केला अशी चर्चा आहे. कंधाल जाडेजा हे पोरबंदर जिल्ह्यातील कुतियाना विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात तर, जयंत पटेल आनंद जिल्ह्यातील उमरेठ मतदारसंघाचे आमदार आहेत. जाडेजा यांच्यावर अनेक गुन्ह्यांची नोंद आहे.  भाजपाने त्यांना नोव्हेंबर अखेरीस होणा-या विधानसभा निवडणुकीत फक्त तिकीट देण्याचेच नव्हे तर,  भाजपाच्या नियंत्रणाखाली असलेल्या डेअरी उद्योगात महत्वाची भूमिका देण्याचा त्यांना शब्द देण्यात आल्याची चर्चा आहे. 

उमरेठचे आमदार जयंत पटेल यांनी राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने 2012 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने केलेल्या मदतीची परतफेड केली. जयंत पटेल यांचा मतदारसंघ आनंद जिल्ह्यात येतो हा जिल्हा काँग्रेसचे प्रमुख नेते भरतसिंह सोलंकी यांचा बालेकिल्ला आहे. जयंत पटेल आधी सारसामधून आमदार होते. मतदारसंघ फेररचनेत त्यांचा मतदारसंघ गायब झाल्यानंतर ते सुरक्षित मतदारसंघाच्या शोधात होते. त्यावेळी त्यांना उमरेठचा सुरक्षित मतदारसंघ देण्यात आला. पुन्हा निवडून येण्यासाठी त्यांना काँग्रेसच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे त्यामुळे त्यांनी अहमद पटेल यांना मतदान केले. 

सत्यमेव जयते! विजयानंतर अहमद पटेल यांची प्रतिक्रियाअत्यंत आव्हानात्मक ठरलेल्या निवडणुकीत भाजपाध्यक्ष अमित शहांची रणनीती आणि भाजपाचे सर्व प्रयत्न हाणून पाडत विजय मिळवल्यानंतर अहमद पटेल यांनी सत्यमेव जयते अशी प्रतिक्रिया दिली आहे. काल राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान झाल्यानंतर राजकीय नाट्य रंगले होते. मात्र अनेक वळणे घेतल्यानंतर आज मध्य रात्री पावणे दोन वाजता निवडणुकीचा निकाल लागला आणि त्यात अहमद पटेल यांनी 44 मते मिळवत अर्ध्या मताने विजय मिळवला.

या विजयानंतर अहमद पटेल यांनी ट्विटरवरून सत्यमेव जयते अशी प्रतिक्रिया दिली. "ही निवडणूक माझ्या राजकीय कारकीर्दीतील सर्वात अवघड निवडणूक होती. बऱ्याच निवडणुका लढवल्या मात्र एवढे आव्हान कधी मिळाले नव्हते. भाजपाकडून मला पराभूत करण्यासाठी सर्वप्रकारचे प्रयत्न करण्यात आले. केंद्र आणि राज्य सरकारने मला पराभूत करण्यासाठी कंबर कसली होती. त्यांचा यामागे काय हेतू होता हे माहीत नाही." असे अहमद पटेल म्हणाले.