शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

संजय राऊत व राघव चढ्ढा यांच्याविरोधात राष्ट्रीय बाल आयोगाचे पत्र, पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 21:16 IST

NCPCR Letter : संजय राऊत आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चढ्ढा व आतिशी यांच्यावर ट्विटरवर 'अल्पवयीन मुलांचे फोटो' शेअर केल्याप्रकरणी चौकशी करून आवश्यक कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे.

नवी दिल्ली : राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने (NCPCR) दिल्ली पोलिसांना पत्र लिहिले आहे. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चढ्ढा व आतिशी यांच्यावर ट्विटरवर 'अल्पवयीन मुलांचे फोटो' शेअर केल्याप्रकरणी चौकशी करून आवश्यक कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच, हे फोटो 'राजकीय अजेंडा पुढे नेण्यासाठी' शेअर केल्याचा आरोप राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने केला आहे. 

याचबरोबर, पोलिसांना पाठवलेल्या पत्रानुसार, या दोन्ही नेत्यांनी कथितपणे फोटो शेअर करण्याचा उद्देश म्हणजे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या विरोधात सुरू असलेल्या सीबीआयच्या तपासापासून लक्ष हटवणे हा होता, असे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे निरीक्षण आहे. दरम्यान, संजय राऊत आणि राघव चढ्ढा हे राज्यसभा सदस्य आहेत तर आतिशी दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पार्टीच्या आमदार आहेत.

राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, संजय राऊत आणि राघव चड्ढा यांच्या सोशल मीडिया पोस्ट्सबद्दल तक्रारी आल्या आहेत. या दोघांनी त्यांच्या ट्विटरवर शेअर केलेल्या फोटोमध्ये मनीष सिसोदिया शाळेत अल्पवयीन विद्यार्थीनीसोबत दिसत आहेत. या प्रकरणाचा तपास आणि आवश्यक कारवाईसाठी दिल्लीच्या पोलिस आयुक्तांना पत्र लिहिले असून त्याची प्रत दिल्लीच्या मुख्य सचिवांना पाठवण्यात आली आहे. तसेच, आयोगाने दिल्ली पोलिसांना बाल न्याय कायद्यांतर्गत योग्य ती कारवाई करण्यास सांगितले आहे.

 

दरम्यान, दिल्लीतील मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना 26 फेब्रुवारी रोजी अटक केली आहे. सिसोदिया यांच्या अटकेनंतर संजय राऊत यांनी एका चिमुकल्या विद्यार्थीनीसोबत संवाद साधत असलेल्या सिसोदिया यांचा फोटो शेअर करत केंद्र सरकारवर टीका केली होती. "भाजप ज्या प्रकारे विरोधी पक्षातील नेत्यांना अटक करत आहे ते पाहून मला भीती वाटते की, भविष्यात भाजपचे नेते सत्तेतून बाहेर पडल्यावर त्यांचे काय होईल. जर त्यांचा असाच छळ झाला तर? त्यांच्या मदतीला कोण येईल? असे ट्विट संजय राऊत यांनी केले होते.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतdelhiदिल्ली