शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
2
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
3
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
4
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
5
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
6
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
7
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
8
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
9
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
10
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
11
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
12
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
13
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
14
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
15
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
16
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
17
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
18
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
19
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
20
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 

कर्नाटक निवडणुकीपूर्वी शरद पवारांना दिलासा! निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय; विनंती मान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2023 14:58 IST

Karnataka Election 2023: राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक आयोगाला केलेली विनंती मान्य करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

Karnataka Election 2023: अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्ष म्हणून असलेला दर्जा केंद्रीय निवडणूक आयोगाने काढून घेतला. यातच कर्नाटकातील विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसकडून घेण्यात आला. या घडामोडींमध्ये आता केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसने केलेली विनंती मान्य केल्याचे सांगितले जात आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना दिलासा मिळाल्याचे म्हटले जात आहे. 

कर्नाटक विधान सभा निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. सर्वच पक्ष कंबर कसून कामाला लागले आहेत. खरे तर भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि जेडीएसमुळे ही निवडणूक आधीच तिरंगी झाली होती. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या एन्ट्रीमुळे ही निवडणूक अधिकच चुरशीची होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कर्नाटकातील २२४ विधानसभा जागांपैकी ४० ते ४५ जागा लढवणार आहे. राजकीय जाणकारांच्या मते, राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळविण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. कर्नाटकात १० मे रोजी विधानसभा निवडणुका होत आहेत. 

निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय; विनंती मान्य

राष्ट्रवादी काँग्रेस कर्नाटक विधानसभा निवडणूक घड्याळ चिन्हावर लढणार आहेत. पक्षाकडून विनंती केल्यानंतर निवडणूक आयोगाने   निर्णय घेतला आहे.राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेल्यानंतर कर्नाटक निवडणूक कोणत्या चिन्हावर निवडणुका लढणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष होते. अखेर  निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. हा निर्णय फक्त या निवडणुकीपुरता मर्यादित असल्याचे सांगितले जात आहे. निवडणूक आयोगाच्या परवानगीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला कर्नाटक निवडणुकांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. 

राष्ट्रवादी कर्नाटक निवडणूक स्वबळावर लढणार 

आम्ही कर्नाटकमध्ये ४६ जागांवर निवडणुका लढणार अहोत. आमचे चिन्ह फ्रिज झाले होते. राष्ट्रवादी कर्नाटक स्वबळावर लढणार आहे. भाजपचा आमदाराने दोन  दिवसांपूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे ताकद वाढणार आहे.  निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आता आम्हाला घडयाळ चिन्हावर निवडणूक लढता येणारे आहे. कर्नाटक निवडणुकीसाठी कर्नाटकमध्ये शरद पवार यांच्या पाच ते सहा सभा घेण्यात येणर आहे, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष आर हरी यांनी दिली. या निवडणुकीसाठी लवकरच उमेदवारांची यादी निश्चित होणार असल्याचे सांगितले जात आहे. 

दरम्यान, खरे तर, गोवा, मेघालय आणि मणिपूर या राज्यांमध्ये राष्ट्रवादीला काँग्रेसला फारसा फायदा झाला नाही. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे निवडणूक चिन्हासंदर्भात अर्जही केला होता, तो आयोगाने स्वीकारला आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Karnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग