शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

शरद पवारांची कारवाई; राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्याची कार्यकारिणीतून हकालपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 17:11 IST

Sharad Pawar News: पक्षविरोधी काम केल्यामुळे शरद पवारांनी ही कारवाई केली आहे.

Sharad Pawar Action: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) सुप्रीमो शरद पवार (Sharad Pawar) यांनी मंगळवारी (8 ऑगस्ट) पक्षातील ज्येष्ठ नेते आणि आमदार थॉमस के थॉमस (Thomas K Thomas) यांची कार्यकारिणीतून हकालपट्टी केली. पक्षाविरोधी काम केल्यामुळे पवारांनी ही मोठी कारवाई केली आहे.

थॉमस हे केरळ विधानसभेतील कुट्टनाड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. केरळमधील सत्ताधारी लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट (LDF) सोबत NCP सत्तेत आहे. अलीकडेच थॉमस यांनी त्यांच्याच पक्षातील काही सदस्यांकडून आपल्या जीवाला कथित धोका असल्याची तक्रार राज्य पोलीस प्रमुखांकडे केली होती. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर ही कारवाई केली आहे.

पवारांचे थॉमस यांना पत्र पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, केरळ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पीसी चाको यांनी थॉमस यांचे आरोप फेटाळून लावले आणि मूर्खपणाचे असल्याचे म्हटले आहे. तसेच, राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्षांच्या अधिकाराची उघडपणे पायमल्ली करुन आणि पक्षाच्या सदस्यांवर बेजबाबदार आरोप केल्यामुळे पक्षाची प्रतिमा डागाळल्याचे पवार यांनी थॉमस यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.पक्षातील तुमच्या पदाचा गैरवापर करुन खोट्या तक्रारी दाखल करणे, यामुळे लोकांमध्ये चांगले संकेत जाणार नाही. तुमचे हे कृत्य पाहता तुम्हाला कार्यकारिणीतून निलंबित करत आहे, असे पवारांनी पत्रात म्हटले. 

काय म्हणाले होते आमदार थॉमस 

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार थॉमस के थॉमस यांनी सोमवारी (7 ऑगस्ट) राज्य पोलीस प्रमुखांकडे तक्रार दाखल केली की, पक्षाचे काही सदस्य त्यांना ठार मारण्याचा कट रचत आहेत. अलाप्पुझा येथील कुट्टनाड जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यासाठी हा कट रचला आहे, असे त्यांनी तक्रारीत म्हटले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसKeralaकेरळPoliticsराजकारण