शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

“मनात शंका आणू नका, आपल्याला भाजपसोबत...”; शरद पवारांचे मोठे विधान, चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 12:24 IST

Sharad Pawar: शरद पवार भाजपला पाठिंबा देणार की, विरोधातच राहणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

Sharad Pawar: लोकसभेनंतर दिल्ली सेवा विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यात  आले. सत्ताधाऱ्यांच्या विजयामुळे आम आदमी पक्ष तसेच विरोधकांना मोठा धक्का बसला. यासंदर्भात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून कुठलाही व्हिप काढण्यात आला नव्हता. तसेच शरद पवार या विधेयकाला विरोध करण्यासाठी सभागृहात हजर होते. पण प्रफुल्ल पटेल यांनी दांडी मारली. यानंतर शरद पवारांनी दिल्लीत पदाधिकाऱ्यांसोबत बोलताना भूमिका स्पष्ट केली, असे सांगितले जात आहे. 

अजित पवार यांनी काही आमदारांसह बंड केल्यामुळे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील बहुतांश आमदारांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला. तर, शरद पवार यांचा गट विरोधी पक्षात आहे. शरद पवार गटातील आमदारांची संख्या कमी असल्याने त्यांना विरोधी पक्षनेते पद काँग्रेसला सोडाव लागले. शरद पवार यांची मनधरणी करण्यासाठी अजित पवार यांच्या गटाकडून प्रयत्न सुरू आहे. शरद पवार हे भाजपला पाठिंबा देणार की, विरोधातच राहणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अशातच शरद पवार यांनी दिल्लीत पदाधिकाऱ्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत भूमिका स्पष्टपणे मांडली, अशी माहिती देण्यात आली आहे.

पक्षाचे नाव, चिन्ह अजित पवार गटाला देण्याबाबत दबाव  

मिळालेल्या माहितीनुसार, पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्याबाबत केंद्राकडून दबाव आहे. पण काहीही झाले तरी आपण पुन्हा सगळे उभे करू. काहीही झाले तरी आपण तडजोड करणार नाही, आपल्याला भाजप विरोधातच लढायचे आहे. मनात कोणीही संभ्रम ठेऊ नका. आपण भाजपबरोबर जाणार नाही. मनात कुठेही शंका आणू नका. आगामी निवडणूकीच्या दृष्टीने पक्षाची बांधणी करा, आपला विचार लोकांपर्यंत घेऊन जा. आगामी निवडणुकांच्या तयारीला लागा, अशा सूचना शरद पवार यांनी पदाधिकाऱ्यांनी दिल्याचे म्हटले जात आहे. 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर आले होते. त्यावेळी लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यात शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच मंचावर होते. त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. महाविकास आघाडीतील नेत्यांकडून या पुरस्काराला शरद पवारांनी जाऊ नये, असे आवाहन करत, अप्रत्यक्षरित्या दबाव आणल्याचे पाहायला मिळाले.

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस