शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर हिंदूंसाठी एकही देश शिल्लक राहणार नाही'; मुस्लीम लोकसंख्या वाढीवरून भाजपचा काँग्रेसवर निशाणा
2
BANW vs INDW : भारतीय महिलांनी रचला इतिहास; बांगलादेशला त्यांच्यात घरात ५-० ने नमवले
3
हरियाणातील BJP सरकार कोसळणार? काँग्रेसने केला बहुमताचा दावा, राज्यपालांना लिहिले पत्र...
4
"आम्हाला रस्त्यावर आणून तू विदेशात स्थायिक", पालकांची ४ पानी सुसाईड नोट, डोळ्यात येईल पाणी
5
संजू सॅमसनला बाद ठरवणाऱ्या Controversial  निर्णयाचा नवा Video, अखेर सत्य समोर आलेच... 
6
'सिकंदर' ची घोषणा झाल्यानंतर सलमान-रश्मिकाचा जुना व्हिडिओ व्हायरल, भाईजानचं तेलुगू ऐका!
7
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
8
'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल
9
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
10
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध
11
विराट कोहलीला पंजाबविरूद्धच्या सामन्यात मोठ्या विक्रमाची संधी; ठरू शकतो पहिलाच भारतीय!
12
मुग्धा गोडसे भडकली, मॉलमधील एका कॅफेत आईला मिळाली वाईट वागणूक; प्रकरण काय?
13
चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी, सुरू आहे Moon Express ची तयारी; NASA थेट रेल्वेच चालवणार!
14
"देशात भाजपा एकटीच 370 पेक्षा जास्त जागा जिंकेल..."; शिवराज सिंह चौहान यांचा मोठा दावा
15
हरियाणामध्ये राजकीय हालचालींना वेग, 'बहुमत चाचणी घ्या', माजी उपमुख्यमंत्र्यांची राज्यपालांकडे मागणी
16
“पराभवाच्या भितीने भांबावल्यानेच नरेंद्र मोदींकडून दररोज असत्य विधाने”; काँग्रेसची टीका
17
राम मंदिराच्या पहिल्या मजल्याचे काम वेगाने सुरु; ‘असा’ असेल राम दरबार, कधी होणार पूर्ण?
18
नफ़रत नहीं, नौकरी चुनो! 'इंडिया'चे सरकार बनतंय; ३० लाख रिक्त सरकारी पदे भरणार : राहुल गांधी
19
"आमचे अणुबॉम्ब कायम सज्ज असतात"; रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची अमेरिकेला खुली धमकी
20
‘पैसे मिळाले नाहीत का तुला? मिळाले नसतील तर...’, भरसभेत अजित पवार यांनी विचारलं आणि...

मतदानापूर्वी मोठी चकमक; टॉप कमांडरसह 18 नक्षलवादी ठार, 3 जवान जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 5:59 PM

छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यातील माड भागात ही चकमक सुरू आहे.

Naxalites Encounter in Chhattisgarh : लोकसभा निवडणूक अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपली आहे. येत्या 19 एप्रिल रोजी देशभरात पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. अशातच छत्तीसगडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील कांकेरमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यात तीन जवान जखमी झाले, तर अनेक नक्षलवादी ठार झाले आहेत.

एसपी कल्याण अलीसेला यांनी चकमकीत 18 नक्षलवादी ठार झाल्याची पुष्टी केली आहे. नक्षलवाद्यांचा टॉप कमांडर शंकर रावही मारला गेल्याचे त्यांनी सांगितले. शंकर राव याच्यावर 25 लाखांचा इनाम होता. घटनास्थळावरुन 7 AK47 रायफल, 1 INSAS रायफल आणि 3LMG देखील जप्त करण्यात आले. जखमी जवानांना जंगलातून बाहेर काढण्यासाठी अतिरिक्त फौजफाटा पाठवण्यात आला आहे. 

बीएसएफची नक्षलविरोधी कारवाईवृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी) यांचे संयुक्त पथक नक्षलविरोधी मोहिमेवर असताना छोटे बेथिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात गोळीबार सुरू झाला. गोळीबारात तीन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले, तर अनेक नक्षलवादी ठार झाले.

राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये नक्षलवाद्यांचा प्रभावछत्तीसगड हे दुसऱ्या क्रमांकाचे नक्षलग्रस्त राज्य आहे. गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, छत्तीसगडमधील बलरामपूर, बस्तर, बिजापूर, दंतेवाडा, धमतरी, गरिआबंद, कांकेर, कोंडागाव, महासमुंद, नारायणपूर, राजनांदगाव, सुकमा, कबीरधाम आणि मुंगेली हे 14 जिल्हे नक्षलग्रस्त आहेत. आकडेवारीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचे हल्ले कमी होत नव्हते. तसे पाहिले तर राज्यात दरवर्षी सरासरी साडेतीनशेहून अधिक नक्षलवादी हल्ले होतात. यामध्ये दरवर्षी सरासरी 45 जवान शहीद होतात.

दुसऱ्या टप्प्यात निवडणुका कांकेरमध्ये 26 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. छत्तीसगडमधील रायपूर आणि जगदलपूर दरम्यान असलेल्या कांकेर लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या 8 जागांचा समावेश आहे, त्यापैकी सहा अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत. या विधानसभा जागांमध्ये गुंडेरदेही, संजरी बालोड, सिहावा (ST), दोंडी लोहारा (ST), अंतागड (ST), भानुप्रतापपूर (ST), कांकेर (ST) आणि केशकल (ST) यांचा समावेश आहे. मूळचा बस्तर जिल्ह्याचा भाग असलेला कांकेर 1998 मध्ये वेगळा जिल्हा बनला.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीChhattisgarhछत्तीसगडCrime Newsगुन्हेगारी