शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

नौदलाच्या ‘INS ब्रह्मपुत्र’ला दुरुस्तीदरम्यान लागली आग, एक कनिष्ठ नाविक बेपत्ता   

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 23:38 IST

Navy's 'INS Brahmaputra' Catches Fire: भारतीय नौदलाच्या आयएनएस ब्रह्मपुत्र या युद्धनौकेला देखभाल दुरुस्तीदरम्यान आग लागल्याची घटना समोर आली आहे. ही युद्धनौका मुंबईतील नौदलाच्या डॉकयार्डमध्ये दुरुस्तीसाठी ठेवण्यात आली होती, त्याचदरम्यान ही दुर्घटना घडली, अशी माहिती नौदलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.  

भारतीय नौदलाच्या आयएनएस ब्रह्मपुत्र या युद्धनौकेला देखभाल दुरुस्तीदरम्यान आग लागल्याची घटना समोर आली आहे. ही युद्धनौका मुंबईतील नौदलाच्या डॉकयार्डमध्ये दुरुस्तीसाठी ठेवण्यात आली होती, त्याचदरम्यान ही दुर्घटना घडली, अशी माहिती नौदलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.  दरम्यान, या दुर्घटनेनंतर नौदलाचा एक कनिष्ठ नाविक बेपत्ता असून, बचाव दलाकडून त्याचा शोध सुरू आहे, अशी माहिती नौदलाकडून देण्यात आली आहे.

नौदलाच्या डॉकयार्ड आणि बंदरामध्ये असलेल्या इतर जहाजांमधील तंत्रज्ञांच्या पथकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. आता ही आग कशी लागली याचा शोध नौदलाच्या अधिकाऱ्यांकडून घेतला जात आहे. तसेच या आगीत किती नुकसान झालं, याचाही आढावा घेतला जात आहे. 

दरम्यान, या दुर्घटनेची माहिती देताना नौदलाने आपल्या अधिकृत वक्तव्यामध्ये सांगितले आहे की,  युद्धनौकेवरील नाविक दलाने नौदलाच्या डॉकयार्ड, मुंबई आणि बंदरातील इतर जहाजांवरील अग्निशामकांच्या मदतीने सोमवारी सकाळपर्यंत या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवलं होतं. या दुर्घटनेमुळे ही युद्धनौका एका बाजूला झुकली आहे. तसेच सर्व प्रयत्नांनंतरही या जहाजाला सरळ स्थितीत आणण्यात अद्याप यश आलेले नाही. तसेच बेपत्ता नाविकाचा शोध सुरू आहे. त्याबरोबरच ही आग कशी लागली, याचाही तपास केला जात आहे.  

टॅग्स :indian navyभारतीय नौदलfireआगMumbaiमुंबई