शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

...अन् ऑस्ट्रेलियाहून रिसेप्शन देण्यासाठी आलेला तरुण दगावला; ट्रॅक्टर मार्चदरम्यान मृत्यू

By कुणाल गवाणकर | Updated: January 27, 2021 17:06 IST

मार्चदरम्यान ट्रॅक्टर उलटल्यानं तरुणाचा मृत्यू; एकुलता एक मुलगा गेल्यानं कुटुंबावर शोककळा

नवी दिल्ली: गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या वेशीवर केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला प्रजासत्ताक दिनी हिंसक वळण लागलं. शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मार्चवेळी अनेक भागांत हिंसाचार झाला. पोलीस आणि आंदोलक आमनेसामने आले. या प्रकरणी २२ एफआयआर नोंदवण्यात आल्या असून २०० जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. याशिवाय शेतकरी नेत्यांविरोधातही गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. दिल्ली हिंसाचार प्रकरणावर मोदी सरकारची पहिली प्रतिक्रिया; मराठमोळ्या मंत्र्यांचं मोठं विधानप्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मार्च सुरू असताना एक ट्रॅक्टर उलटला. यामध्ये नवरीत नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला. नवरीत याआधी दोनदा शेतकरी आंदोलनात सहभागी झाला होता. प्रजासत्ताक दिनी तो ट्रॅक्टर मोर्चात सहभागी झाला. मात्र घरी परतलाच नाही. त्याच्या मृत्यूची माहिती समजताच कुटुंबावर शोककळा पसरली. नवरीत आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता.अमित शहा इन ऍक्शन! गृह मंत्रालय मोठी कारवाई करण्याच्या तयारीत; पुढील काही तास महत्त्वाचेरुद्रपूरच्या जवळ असलेल्या रामपूरच्या डिबडिबा गावात वास्तव्यास असलेला २६ वर्षीय नवरीत आधी ऑस्ट्रेलियात राहायचा. त्याच्याकडे ऑस्ट्रेलियाचा स्टडी व्हिसा होता. दोन वर्षांपूर्वी त्यानं ऑस्ट्रेलियात मनशीत कौरसोबत विवाह केला. रिसेप्शन देण्यासाठी तो घरी आला होता. स्टडी व्हिसावर नोकरी केल्या प्रकरणी त्याच्या विरोधात तक्रार दाखल झाली. त्यामुळे त्याच्यावर तीन वर्षांची बंदी घालण्यात आली. नवरीतला भारतात परतून दोन वर्ष झाली होती. तो आणखी वर्षभरानं पुन्हा ऑस्ट्रेलियात जाणार होता.शेतकऱ्यांबद्दलचं विधान भोवलं; ६ दिग्गज ब्रँण्ड्सकडून कंगना रणौतसोबतचे करार रद्दशेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नवरीत दोनदा दिल्लीला गेला होता. केंद्रानं मंजूर केलेले तिन्ही कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नाहीत. त्यामुळे ते रद्द केले जावेत, अशी नवरीतची भूमिका होती. याच मागणीसाठी काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर मोर्चात नवरीत सहभागी झाला. मात्र मार्चदरम्यान नवरीतचा ट्रॅक्टर उलटला. त्यात त्याचा मृत्यू झाला. याची माहिती कुटुंबीयांना समजताच त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला.

टॅग्स :Farmerशेतकरी