शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Navneet Rana: रामदास आठवलेंनी घेतली राणा दाम्पत्याची भेट, दिलं महत्त्वाचं आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 23:49 IST

लिलावती रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर मीडियाशी संवाद साधताना नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला

नवी दिल्ली - अमरावतीच्या खासदार आणि मातोश्रीबाहेर आंदोलन करत हनुमान चालिसा पठण करण्याचा हट्ट धरलेल्या नवनीत राणा ह्या तुरुंगातून बाहेर आल्यापासून चर्चेत आहेत. तुरुंगातून बाहेर येताच त्यांनी लिलावती रुग्णालयात उपचार घेतले. या रुग्णालयातील त्यांचे फोटो चांगलेच व्हायरल झाले होते. रुग्णालयातून डिस्चार्ज घेतल्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधताना शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला. त्यानंतर, थेट दिल्ली गाठत राणा दाम्पत्याने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. तर, आज केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवलेंनी राणा दाम्पत्यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली.    

लिलावती रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर मीडियाशी संवाद साधताना नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. त्यानंतर, सोमवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. त्यावेळी, अटकेपासून लॉकअपपर्यंत आणि सुटकेपासून रुग्णालायतून घरी पोहोचेपर्यंत घडलेल्या प्रसंगाची इतंभू माहिती आपण लोकसभा अध्यक्षांना दिल्याचे नवनीत राणा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. माझ्या तक्रारीची दखल घेत माझी संपूर्ण बाजू मांडण्यासाठी मला 23 तारीख देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. राणा यांच्या पुढील भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, रामदास आठवले यांनी राणा दाम्पत्याच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी, नवनीत राणा यांच्या प्रकृतीची विचारपूसही केली. तसेच, अन्यायाविरुद्धच्या लढ्यात, न्यायासाठीच्या संघर्षात रिपब्लिकन पक्ष आपल्या सोबत असेल, अशी ग्वाहीही आठवलेंनी नवनीत राणा यांना दिली. या भेटीचा फोटो त्यांनी ट्विटरवरुन शेअर केला आहे. 

१८ दिवसानंतर आई-वडिलांची भेट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवर हनुमान चालिसा पठणावरून खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांना १४ दिवस कारागृहात राहावे लागले. या काळात त्यांची मुले ही अमरावती येथील ’गंगा-सावित्री’निवावस्थानीच होते. अखेर मुलगी आरोही आणि मुलगा रणवीर हे मंगळवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास विमानाने दिल्लीकडे रवाना झाले. तब्बल १८ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर दोन्ही मुलांनी दिल्लीत जाऊन आई-वडिलांची भेट घेतली. 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेnavneet kaur ranaनवनीत कौर राणाBJPभाजपाShiv Senaशिवसेना