शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नवनीत प्रकाशनचे संचालक नवीन शहा यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2017 11:58 IST

मागच्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेले अहमदाबाद येथील विकासक आणि नवनीत प्रकाशनाचे संचालक नवीन शहा (59) यांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देनवनीत प्रकाशनाचे संचालक नवीन शहा अखेर मृतावस्थेत सापडले आहेत.  नवीन शहा यांची हत्या झाल्याचा दाट संशय आहे.

सूरत, दि. 28 - मागच्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेले अहमदाबाद येथील विकासक आणि नवनीत प्रकाशनाचे संचालक नवीन शहा (59) अखेर मृतावस्थेत सापडले आहेत.  गुजरातच्या अरवली जिल्ह्यात त्यांचा मृतदेह सापडला. नवीन शहा यांची हत्या झाल्याचा दाट संशय आहे. मंगळवार दुपारपासून नवीन शहा बेपत्ता होते. कार्यालयात जाण्यासाठी नवीन शहा दुपारी बोपाल येथील घरातून बाहेर पडले. ते घरी परतलेच नाहीत. 

अदालाज पोलीस स्थानकात ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. बेपत्ता झाल्यापासून शहा यांचा मोबाईल फोन स्विच ऑफ होता अशी माहिती गांधीनगरचे एसपी विरेंद्र कुमार यादव यांनी दिली. शहा वैष्णवदेवी सर्कलजवळच्या गोरबंध हॉटलेजवळून बेपत्ता झाले होते. त्यांनी गाडीचा चालक प्रभात देसाईला हॉटेलजवळ थांबायला सांगितले पण ते परतलेच नाहीत अशी माहिती अदालाज पोलीस ठाण्याचे निरीक्षक के.के. पांडया यांनी दिली. 

नवीन शहा हे नवनीत पब्लिकेशनचे मालक लालजीभाई शहा यांचे जावई होते. लालजीभाई यांची मुलगी कंचनबेनबरोबर त्यांचे लग्न झाले होते.