शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

श्रीलंकेनंतर इसिसनं भारत अन् बांगलादेशला दिली दहशतवादी हल्ल्याची धमकी, पोस्टर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2019 08:39 IST

इस्लामिक स्टेट (इसिस)शी संलग्न असलेल्या 'अल मुरसलत' नावाच्या दहशतवादी संघटनेनं श्रीलंकेसारखेच भारत आणि बांगलादेशाला दहशतवादी हल्ल्याची धमकी दिली

नवी दिल्लीः इस्लामिक स्टेट (इसिस)शी संलग्न असलेल्या 'अल मुरसलत' नावाच्या दहशतवादी संघटनेनं श्रीलंकेसारखेच भारत आणि बांगलादेशाला दहशतवादी हल्ल्याची धमकी दिली आहे. इसिसनं अशा धमकीचे पोस्टर्सही जारी केले आहेत. बंगाल आणि हिंदमध्ये खलिफाचा लढा उभारणाऱ्यांचा आवाज कधीही बंद होऊ शकत नाही. आमच्या बदल्याची आग कधीही शांत होणार नाही. ईस्टरच्या दिवशीही श्रीलंकेत तीन चर्चं आणि तीन हॉटेलमध्ये आत्मघातकी हल्ला केला होता, त्यात 253 लोकांना मारण्यात आलं, असं इसिसच्या दहशतवाद्यांनी सांगितलं आहे. गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, इसिसनं अबू मोहम्मद अल- बंगालीला बांगलादेशातील आपला म्होरक्या नियुक्त केला आहे. बंगालीला दहशतवादी हल्ल्याची योजना बनवणं आणि दहशतवाद्यांची भरती करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. धमकीचे पोस्टर जारी करण्याआधीही इसिसनं बांगलादेशची राजधानी ढाकातल्या गुलिस्ताँ थिएटरमध्ये कमी तीव्रतेचा स्फोट घडवला होता. यात कोणाचा मृत्यू झाला नसला तरी पोलीस कर्मचारी जखमी आहेत.

विशेष म्हणजे इसिसनं ही धमकी अशा वेळी दिली जेव्हा इसिसचा म्होरक्या अबू बक्र अल बगदादीचा एक व्हिडीओ समोर आला होता. ज्यात सीरियात इसिसनं पराभव स्वीकारला आहे आणि मुस्लिमांना भडकाऊ भाषण दिली आहेत. त्यामुळेच गुप्तचर यंत्रणा इसिसच्या होणाऱ्या छोट्या छोट्या घटनांवर लक्ष ठेवून आहे.  

टॅग्स :ISISइसिस