शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय सरचिटणीस की प्रचार समिती अध्यक्ष? सचिन पायलट यांच्यापुढे दोन प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2023 12:42 IST

राहुल गांधी अमेरिकेतून आल्यावर होणार निर्णय

आदेश रावल

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांची समजूत घालण्याचा काँग्रेसश्रेष्ठी सर्वप्रकारे प्रयत्न करीत आहेत. काँग्रेस नेतृत्वाने पायलट यांच्यासमोर दोन प्रस्ताव ठेवले आहेत.

  • पहिला प्रस्ताव - संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी ज्येष्ठ नेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी चर्चा केल्यानंतर पायलट यांना म्हटले आहे की, काँग्रेस नेतृत्व आपल्याला पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्त करू इच्छित आहेत.
  • दुसरा प्रस्ताव - राजस्थान विधानसभा निवडणुकीपूर्वी ते प्रचार समितीचे अध्यक्षही होऊ शकतात. परंतु सचिन पायलट यांची इच्छा आहे की, ते राजस्थानच्या राजकारणातच राहू इच्छितात. ते राजस्थान सोडू इच्छित नाहीत. अशा स्थितीत त्यांना काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे की, ते राजस्थानमध्येच राहू इच्छित आहेत, तर प्रचार समितीचे अध्यक्षपद त्यांना दिले जाऊ शकते. सचिन पायलट यांनी आपली ताकद दाखवण्यासाठी नुकतेच  आपल्या सरकारविरोधात मोठे आंदोलन केले होते.

१८ जूननंतर अंतिम निर्णय

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू हेही विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रचार समितीचे अध्यक्ष होते. या सर्व प्रस्तावांवर १८ जूननंतर अंतिम निर्णय होईल. तोपर्यंत राहुल गांधी विदेशातून परततील. यापूर्वी मे महिन्याच्या अखेरीस राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यात दीर्घ बैठक झाली होती.

टॅग्स :Sachin Pilotसचिन पायलटRajasthanराजस्थान