शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

काश्मिरात ग्रा.पं.वर स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वज फडकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 04:54 IST

येत्या स्वातंत्र्यदिनी जम्मू आणि काश्मीरमधील प्रत्येक ग्रामपंचायतीवर राष्ट्रध्वज फडकवला जाईल, असे केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितले.

नवी दिल्ली : येत्या स्वातंत्र्यदिनी जम्मू आणि काश्मीरमधील प्रत्येक ग्रामपंचायतीवर राष्ट्रध्वज फडकवला जाईल, असे केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितले. यासाठी केंद्र सरकारने राज्यातील सगळ्या ग्रामपंचायतींच्या सरपंचांना सूचना पाठवल्या आहेत व १५ आॅगस्ट रोजी राष्ट्रध्वज आपापल्या पंचायतींवर फडकवला जाईल याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे, असेही त्या आदेशात स्पष्ट करण्यात आल्याचे रेड्डी यांनी पत्रकारांना सांगितले. काश्मीरमधील जनतेनेही आपापल्या घरांवर स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वज उभारला पाहिजे, असेही आवाहन रेड्डी यांनी केले आहे.रेड्डी म्हणाले की, तेथील परिस्थिती हळूहळू सामान्य होत आहे. लोक घरांतून बाहेर पडत आहेत आणि कुठूनही कोणत्याही प्रकारच्या गडबड, गोंधळाचे वृत्त नाही. पाकिस्तानने आम्ही काहीही व कोणत्याही थराला जाऊन करायला तयार आहोत, असे उघडपणे त्यांच्या नॅशनल असेम्ब्लीमध्ये म्हटलेले असल्यामुळे जम्मू आणि काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर लष्कर तैनात करण्यात आले आहे. श्रीनगर विमानतळावरून काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद आणि माकपचे नेते सीताराम येचुरी यांना परत पाठवल्याबद्दल बोलताना रेड्डी यांनी सुरक्षा व्यवस्था नजरेसमोर ठेवून त्यांना परत पाठवले गेले. असेच पाऊल राज्याच्या पोलिसांनीही उचलले आहे, असे सांगितले.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर