शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

National Film Awards: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्याकडे 65 पुरस्कार विजेत्यांनी फिरवली पाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2018 21:17 IST

65वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात यंदा मोठा वाद उफाळून आलाय. केवळ 11 पुरस्कार विजेत्यांनाच राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.

नवी दिल्लीः 65वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात यंदा मोठा वाद उफाळून आलाय. केवळ 11 पुरस्कार विजेत्यांनाच राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. मात्र, या निर्णयाला इतर विजेत्या कलाकारांनी तीव्र विरोध केला. राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार वितरण न झाल्यानं 65 पुरस्कार विजेत्यांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे.यावेळी 131 पैकी 65 विजेत्यांनी या पुरस्कार वितरण सोहळ्याकडे पाठ फिरवली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे कार्यक्रमाच्या ठिकाणी साडेपाच वाजता उपस्थित राहणार होते. परंतु माहिती प्रसारणमंत्री स्मृती इराणी यांनी राज्यमंत्री हर्षवर्धन राठोड आणि सचिव नरेंद्र कुमार सिन्हा यांच्या उपस्थितीत साडेतीन ते साडेपाचच्यादरम्यान अनेक विजेत्यांना पुरस्कार दिले. या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त करत 65 पुरस्कार विजेत्यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला.मागील 64 वर्षांपासून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हे राष्ट्रपतींच्या हस्ते देण्याची प्रथा आहे. परंतु ही प्रथा भाजपा सरकारनं मोडीत काढली. राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळणार नसल्यामुळे अनेक पुरस्कार विजेत्यांनी निषेध करत पुरस्कार सोहळ्याकडेच पाठ फिरवली.