शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कलम 370 रद्द केल्याप्रकरणी नॅशनल कॉन्फरन्सची सुप्रीम कोर्टात धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 16:24 IST

आज जम्मू-काश्मीरमधील काही भागात संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कमल 370 केंद्र सरकारने रद्द केल्याप्रकरणी नॅशनल कॉन्फरन्सने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. काश्मीरमधील फुटीरतावादी नेते अब्दुल गनी लोन यांच्या मुलगा व नॅशनल कॉन्फरन्सचे नेते अकबर लोन आणि हसनैन मसूदी यांनी सुप्रीम कोर्टात कलम 370 रद्द केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. 

अकबर लोने आणि हसन मसुदी यांनी दाखल केलेल्या याचिकेत जम्मू-काश्मीरचे दोन तुकड्यात केलेले विभाजन असंवैधानिक आणि लोकशाहीच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे. तसेच, कलम 370 संदर्भातील निर्णयाला लवकरात लवकरत स्थगिती द्यावी, अशी विनंती या याचिकेत केली आहे. 

गेल्या आठवड्यात जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देण्यात येणारे कलम 370 हटवल्यानंतर केंद्र सरकारने जम्मू-काश्मीर आणि लडाखला केंद्र शासित प्रदेश म्हणून जाहीर केले. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे जम्मू-काश्मीरमधील राजकीय वातावरण तापले असता येथील अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांचा समावेश आहे. 

दरम्यान, कलम 370 रद्द करण्याआधी केंद्र सरकारने येथील परिस्थिती चिघळण्याची चिन्हे लक्षात काश्मीरमध्ये संचारबंदी लागू केली होती. तसेच, मोठ्याप्रमाणात जवान काश्मीर खोऱ्यात पाठविले होते. मात्र, आज जम्मू-काश्मीरमधील काही भागात संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे. तसेच, सध्या काश्मीरमधील जनजीनन सुरुळीत असून एटीएम, दुकाने सुरु आहेत. तर, आजपासून शाळा, महाविद्यालये सुरू झाली आहेत.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरSupreme Courtसर्वोच्च न्यायालयArticle 370कलम 370