शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

National Awards : सरकारनं आमचा अपमान केला, प्रसाद ओक यांनी व्यक्त केला संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2018 13:31 IST

राजधानी नवी दिल्लीतील विज्ञान भवनात 65व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण होणार आहे. मात्र, या सोहळ्यात विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार नसल्यानं वाद निर्माण झाला आहे.

नवी दिल्ली - राजधानी नवी दिल्लीतील विज्ञान भवनात 65व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण होणार आहे. मात्र, या सोहळ्यात विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार नसल्यानं वाद निर्माण झाला आहे. यंदा या पुरस्कार सोहळ्यात काही विजेत्यांना राष्ट्रपतींच्याऐवजी माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. केवळ 11 पुरस्कार विजेत्यांनाच राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मात्र, या निर्णयाला विजेत्या कलाकारांनी तीव्र विरोध केला आहे. आम्ही राष्ट्रपतींच्याच हस्ते पुरस्कार स्वीकारू, अन्यथा सोहळ्यावर बहिष्कार टाकू, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे आज संध्याकाळी होऊ घातलेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यावर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे. दरम्यान, यावर अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

''राष्ट्रपतींऐवजी दुसरं कोणी जर पुरस्कार देणार असतील तर ते आमचे कष्ट, आमच्या भाषेचा अपमान आहे'', असं सांगत प्रसाद ओक यांनी नाराजी व्यक्त केली आहे.  यंदाचा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून कच्चा लिंबू या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. पुरस्कारासाठी प्रसाद ओक आणि निर्माते मंदार देवस्थळी हे नवी दिल्लीला गेले असून त्यांनीही पुरस्कार वितरण सोहळ्याच्या बदलण्यात आलेल्या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे. ''हे काय गल्लीतील लोकांना जमून केलेलं नाटक आहे का? ज्याला गल्लीतला कोणीतरी येऊन पुरस्कार देतो ? हे राष्ट्रीय पुरस्कार आहेत जे राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान केले जातात. आम्हाला पुरस्कारासाठी जे पत्र पाठवण्यात आलेले आहे त्यावरही ठळक अक्षरात हे पुरस्कार राष्ट्रपती प्रदान करतील असं लिहलेलं आहे'',  अशा शब्दात प्रसाद ओक यांनी संताप व्यक्त केला. 

टॅग्स :65th National Film Awardsराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2018Prasad Oakप्रसाद ओक