शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

लोकसभा निवडणूक निकाल 2019 : रालोआला गूडबाय केलेले मित्र निष्प्रभ; नव्या मित्रपक्षांनी भरून काढला बॅकलॉग

By प्रेमदास राठोड | Published: May 24, 2019 5:25 AM

राष्ट्रीय लोकशाही आघाडीत राहून गेली सार्वत्रिक निवडणूक लढविलेल्या काही मित्रपक्षांनी नंतर रालोआला गूडबाय केला.

- प्रेमदास राठोडराष्ट्रीय लोकशाही आघाडीत राहून गेली सार्वत्रिक निवडणूक लढविलेल्या काही मित्रपक्षांनी नंतर रालोआला गूडबाय केला. पण ते मित्रपक्ष या निवडणुकीत निष्प्रभ ठरले. गेल्यावेळी रालोआने ३३६ जागा जिंकल्या होत्या, त्यात भाजपाचा २८२ जागांचा वाटा होता. यावेळी भाजपाने स्वत:च्या जागा तर ३०० पार केल्या, शिवाय रालोआचे संख्याबळ ३५० वर नेऊन पोहोचविले. तेलगू देसमने गेल्यावेळी आंध्र प्रदेशात ३० उमेदवार उतरवून १६ जागा जिंकल्या होत्या. त्याचा बॅकलॉग यावेळी बिहारात अवघ्या १७ जागा लढविलेल्या जेडीयूने १६ जागा जिंकून भरून काढला. २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील २४ घटकपक्ष मैदानात उतरले होते. यावेळी २१ घटक पक्षांनी निवडणूक लढविली. यावेळी सामील झालेल्या नवीन १२ घटक पक्षाचा फायदा मिळाला.राओलाचे नेतृत्व करणाऱ्या भाजपाने गेल्यावेळी ४२७ जागा लढवून २८२ जागा जिंकल्या होत्या. यावेळी ४३७ जागा लढवून स्वत:चे संख्याबळ तीनशेवर नेले. भाजपा व तेलगू देसमनंतर राओलातील सर्वांत मोठा घटकपक्ष शिवसेनेने महाराष्ट्रात गेल्यावेळी २० पैकी १८ जागा जिंकल्या होत्या, यावेळी २३ जागा लढवूनही संख्याबळ मात्र जुनेच कायम राखले. भाजपाने महाराष्ट्रातील २३ हे जुने संख्याबळ कायम राखले आहे. गेल्यावेळी रालोआत राहून ३० लढविलेल्या तेलगू देसमने १६ जागा जिंकल्या होत्या. राओलाबाहेर पडल्यावर तेलगू देसमला यावेळी आंध्रात फक्त ३ जागांवर समाधान मानावे लागले. तेथे वायएसआर काँग्रेसने तेलगू देसमचा पार सुपडासाफ केला आहे. भाजपाला गेल्यावेळी एकसंघ आंध्र प्रदेशात ३ जागा मिळाल्या होत्या. यावेळी एकट्या तेलंगणातच भाजपा ४ जागा जिंकताना दिसत आहे. महाराष्ट्रात रालोआतून बाहेर पडलेल्या स्वाभिमानी पक्षाला त्याची एकमेव जागाही यावेळी राखता आली नाही. याशिवाय राष्ट्रीय लोकसमता पार्टी (३), नागा पीपल्स फ्रंट (१), नॅशनल पीपल्स पार्टी (१), स्वाभिमानी पक्ष (१) यांनीही गेल्यावेळी राओलाच्या यशात खारीचा वाटा उचलला होता. आघाडीतून बाहेर पडल्यावर त्यांचा यावेळी टिकाव लागू शकला नाही.लोक जनशक्ती पार्टी, शिरोमणी अकाली दल, अपना दल (सोनेलाल), एन.आर. काँग्रेस, पीएमके, डीएमडीके आणि पीएनके यावेळीही रालोआसोबत होते. शिरोमणी अकाली दलाने गेल्यावेळी पंजाबातून ४ जागा रालोआच्या झोळीत टाकल्या होत्या. यावेळी १० जागा लढलेल्या शिरोमणी अकाली दलाला फक्त दोनच जागांवर यश मिळताना दिसत आहे. बिहारात जेडीयूला सोबत घेणे रालोआला लाभदायक ठरले. आसामात आसाम गण परिषदेशी दोस्ती भाजपाला फायद्याची ठरली. भाजपाने येथील स्वत:चे संख्याबळ ७ वरून ९ वर पोहोचवले आहे. मात्र, अण्णाद्रमुकला रालोआत घेऊन तामीळनाडूत २० जागा सोडणे तेवढे फायदेशीर ठरले नाही. कारण रालोआच्या संख्याबळात हा घटकपक्ष जेमतेम एक-दोन जागांची भर घालताना दिसत आहे. दुरावलेले मित्रपक्ष रालोआचा खेळ बिघडवण्याऐवजी स्वत:चाच खेळ बिघडवून बसले, असे रालोआच्या या निवडणुकीतील एकूण कामगिरीवरून दिसते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Andhra Pradesh Lok Sabha Election 2019आंध्रप्रदेश लोकसभा निवडणूक 2019Assam Lok Sabha Election 2019 आसाम लोकसभा निवडणूक 2019