शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Naseeruddin Shah : 'मुस्लीम नरसंहाराचं आवाहन करणारे गृहयुद्धाला निमंत्रण देताहेत'; नसीरुद्दीन शाहांनी व्यक्त केला संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 12:48 IST

Naseeruddin Shah : धर्म संसदेमध्ये करण्यात आलेल्या वादग्रस्त विधानावर नसीरुद्दीन शाह यांनी आता आपली प्रतिक्रिया दिली आहे.

नवी दिल्ली - ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांनी धर्म संसदेमध्ये करण्यात आलेल्या वादग्रस्त विधानावर आता आपली प्रतिक्रिया दिली आहे. "जे लोक मुस्लिमांच्या नरसंहाराचं आवाहन करत आहेत ते लोक खरं तर देशामधील गृहयुद्धाला निमंत्रण देत आहेत" अशा शब्दांत आपला संताप व्यक्त केला आहे. 'द वायर'ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये नसीरुद्दीन शाह यांनी वरिष्ठ पत्रकार करण थापर यांच्याशी चर्चा करताना याबाबत भाष्य केलं आहे. 

"सध्या जे काही सुरू आहे ते पाहून धक्का बसतो. वादग्रस्त विधानं करणारे नक्की काय बोलत आहेत याचा त्यांना अंदाजही नसावा. ते लोक ज्या प्रकारचं आवाहन करत आहे ते एखाद्या गृहयुद्धाप्रमाणे आहे" अशी जोरदार टीका शाह यांनी केली आहे. 20 कोटी लोकसंख्येला तुम्ही अशाप्रकारे संपवण्याचं विधान करू शकत नाही असं नसीरुद्दीन शाह यांनी म्हटलं आहे. तसेच अशाप्रकारच्या विधानांविरोधात लढण्यासाठी मुस्लीम तयार आहेत असाही विश्वास व्यक्त केला आहे.

"मुस्लीम अशा विधानांविरोधात लढण्यास तयार"

"मुस्लीम अशा विधानांविरोधात लढण्यास तयार आहेत कारण आम्ही सर्वजण इथलेच आहोत. आमच्या पिढान्पिढ्या येथेच राहिल्यात आणि येथेच मरण पावल्यात. जे लोक अशाप्रकारची वादग्रस्त आणि भावना भडवणारी विधानं करत आहेत ते लोक नक्की काय बोलतायत त्यांचा त्यांना अंदाज नसेल" असा सणसणीत टोलाही शाह यांनी लगावला आहे. अशाप्रकारच्या विधांनाविरोधात कोणत्याही प्रकारचं आंदोलन सुरू झालं तर त्याने मोठं नुकसान होईल असं आपल्याला वाटत असल्याचंही नसीरुद्दीन शाह यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Naseeruddin Shahनसिरुद्दीन शाहIndiaभारतMuslimमुस्लीम