शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

पंजाब-हरयाणात वाढतायत शेतातील कडपे जाळण्याचे प्रकार, नासाकडून फोटो प्रसिद्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 09:53 IST

दिल्ली आणि एनसीआरमध्ये दिवसेंदिवस प्रदूषण वाढत चाललं आहे.

नवी दिल्लीः दिल्ली आणि एनसीआरमध्ये दिवसेंदिवस प्रदूषण वाढत चाललं आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि इतर प्रदूषणाच्या गुणवत्तेची चाचणी करणाऱ्या संस्थांच्या मते दिल्लीतल्या आजूबाजूला असलेले राज्य पंजाब आणि हरयाणात कापलेल्या भातातील कडपे जाळण्याचे प्रकार वाढले आहेत, त्याचा परिणाम म्हणून दिल्लीतलं प्रदूषण वाढत असल्याचाही निष्कर्ष त्यांनी नोंदवला आहे.नासानं घेतलेल्या फोटोमधून हे सिद्ध होतंय की, भात कापून झाल्यानंतर शेतात उरलेले कडपे शेतकरी जाळतात, त्यामुळेच प्रदूषणात वाढ होते, असा दावाही या यंत्रणांनी केला आहे.  नासानं दिल्लीला लागून असलेल्या काही राज्यांचे सेटलाइटच्या माध्यमातून फोटो घेतले आहेत. या फोटोमध्ये 'रेड स्पॉट' शेतात भात कापून झालेल्या कडप्यांना लावलेली आग दर्शवत आहेत. पंजाब आणि हरयाणात शेतातले कडपे जाळण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. त्यामुळे दिल्ली आणि आजूबाजूच्या राज्यात प्रदूषण वाढतच आहे.अशाच दिल्ली सरकारनं प्रदूषण कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. त्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनीही एक ट्विट केलं आहे. त्यात ते म्हणतात, पंजाब आणि हरयाणच्या सरकारला माझी हात जोडून विनंती आहे की, दिल्लीला गॅस चेंबर बनवण्यापासून रोखण्यासाठी काही ठोस पावलं उचला. आम्ही आमच्या पातळीवर लागोपाठ प्रयत्न करत आहोत. प्रदूषण नियंत्रित करण्याचे प्रयत्न पुढेसुद्धा सुरूच ठेवू. नासानं दिलेल्या फोटोतून स्पष्ट दिसत आहे की, शेतातील कडपे जाळण्याचे प्रकार कमी होण्याऐवजी वाढतच चालले आहेत. तसेच दिवाळीमध्ये फोडण्यात आलेल्या फटाक्यांनीही दिल्ली-एनसीआरच्या प्रदूषणात वाढ केलेली आहे. सेंटर फॉर सायन्स इन्व्हायरन्मेंट(सीएसई)च्या रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे. 

टॅग्स :NASAनासा