शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

नर्मदेच्या बॅक वॉटरने केला घात

By admin | Updated: August 5, 2015 23:29 IST

मध्यप्रदेशातील दुहेरी रेल्वे अपघात मुसळधार पावसामुळे झाल्याचे मानले जात असले तरी नर्मदेवरील धरणाचे पाणी सोडण्यात आल्याने ही भीषण घटना घडली

राजेंद्र पाराशर, भोपाळमध्यप्रदेशातील दुहेरी रेल्वे अपघात मुसळधार पावसामुळे झाल्याचे मानले जात असले तरी नर्मदेवरील धरणाचे पाणी सोडण्यात आल्याने ही भीषण घटना घडली असण्याची शक्यता अधिक आहे. नर्मदा नदीवरील धरणातून सतत पाणी सोडण्यात येत असल्याने तिच्या उपनद्यांमधील पाण्याची पातळी वाढते आणि हे पाणी उपनद्या आणि त्यांच्या आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या लोकांसाठी धोकादायक ठरते. मंगळवारी रात्री झालेल्या अपघातामागेही नदीत अचानक वाढलेली पाण्याची पातळी हेच मूळ कारण असावे. या पाण्यामुळे रेल्वेरुळावरील माती खचली आणि अपघात झाला. नर्मदेवर बांधण्यात आलेल्या धरणांमधून (जबलपुरातील बरगी, होशंगाबाद जिल्ह्यातील तवा) सतत सोडण्यात येणारे पाणी आणि इंदिरा सागर व ओंकारेश्वर धरणात होणारा जलसाठासुद्धा अपघातास कारणीभूत ठरला आहे. अपघाताच्या वेळी बरगी धरणातून पावणेसात मीटर, तर तवामधून दोन मीटर पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे नर्मदेच्या उपनद्यांमधील बॅक वॉटर वाढले आहे. हेच बॅक वॉटर रेल्वेमार्गाची जमीन ठिसूळ करीत आहे. हरदाजवळ ही घटना घडली ते स्थळसुद्धा काली माचक नदीच्या जवळ आहे. पावसाळ्यात या नदीतील पाण्याची पातळी सातत्याने वाढत असते. सरकार हे संपूर्ण बुडीत क्षेत्र मानत नसले तरी हरदा जिल्ह्यातील अनेक गावे आजही बुडीत क्षेत्रात येतात; परंतु सरकारला अद्याप याचे गांभीर्य उमजलेले नाही. गावकऱ्यांनी यासाठी अनेकदा धरणे आंदोलन केले आहे.कसा झाला अपघात?मंगळवारी रात्री ११.३० वाजता सर्वप्रथम मुंबईहून वाराणसीला जाणारी कामयानी एक्स्प्रेस पुलावरून गेली. जमीन खचल्याने रेल्वेमार्ग तुटला आणि ११ डबे रुळावरून खाली घसरले. ६ डब्यांचे अधिक नुकसान झाले. त्यानंतर २० मिनिटांनी म्हणजे ११.५० वाजता पुलावरीलच दुसऱ्या रेल्वे रुळावरून आलेल्या पाटणा-मुंबई जनता एक्स्प्रेसचेही ९ डबे आणि इंजिन अपघातग्रस्त झाले. या गाडीचे चार डबे उद्ध्वस्त झाले.